Next
‘राष्ट्रवादी’तर्फे महिलांवरील अन्यायाबाबत जनजागृती
प्रेस रिलीज
Tuesday, December 04, 2018 | 02:59 PM
15 0 0
Share this article:



पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘युनायटी टू एंड व्हायोलन्स अगेन्स्ट गर्ल्स अँड वुमेन’ मोहिम राबविण्यात आली. लहान मुली, युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने समाजात जागृती निर्माण करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

एक व दोन डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष मनाली भिलारे व सांस्कृतिक, कला व साहित्य विभागाचे सनी मानकर यांनी हा उपक्रम राबविला. या मोहिमेंतर्गत युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख भागात कथ्थकली व ग्रुप डान्सच्या स्वरूपात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला. खासदार अॅड. वंदना चव्हाणदेखील या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या.



औंध, परिहार चौक, जंगली महाराज रोड, एफसी रोड, डेक्कन, सारसबाग, सिंहगड रोड, कर्वेनगर, एमआयटी कॉलेज, पौड रोड या भागांत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष भिलारे म्हणाल्या, ‘लहान मुली, युवती व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या अत्याचारांचे स्वरूपदेखील भयानक होत आहे. महिलांवरील अत्याचार हा केवळ स्त्री जातीचा प्रश्न नाही, तर हा सामाजिक प्रश्न आहे म्हणूनच आपण सर्वांनी या प्रश्नावर एकत्र काम करण्याची गरज आहे.’



मानकर म्हणाले, ‘समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी ही मोहीम राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि सांस्कृतिक, कला व साहित्य विभाग यांनी हाती घेतली आहे. यामध्ये महिला, युवती, युवक सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search