Next
‘शक्ती पंप’च्या लाभात ६० टक्क्यांनी वाढ
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 12:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारताची अग्रगण्य एनर्जी एफिशिएंट स्टेनलेस स्टील आणि सोलर इंटिग्रेटेड पंप बनवणारी शक्ती पंप (इंडिया) लिमिटेडचा वार्षिक आर्थिक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या ४३१ कोटीच्या तुलनेत ३१ मार्च २०१८ ला समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात कंपनीला एकूण ४४० कोटींचा नफा दर्शवला असून, यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. निव्वळ नफ्यात ३४.८४ कोटी रुपये वाढ म्हणजेच ६० टक्के नफा मिळाला आहे.

शक्ती पंप कंपनीमार्फत ११० देशांमध्ये उत्पादनाची निर्यात केली जाते. या वेळी ‘शक्ती पंप’चे (इंडिया) चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश पाटीदार म्हणाले, ‘कंपनी ज्या धोरणांनुसार कार्य करत आहे त्याचा परिणाम दिसून येतो. कंपनीने ३७ टक्के डिव्डीडेंड (लाभ) देण्याची शिफारस केली आहे. (फेस वेल्यू वर) जे जवळपास लाभच्या २० टक्के आहे. एमएनआरई, राज्य सरकार, आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स (आईएसए), नाबार्ड आदींद्दवारा आम्ही भविष्यातसुद्धा सोलर प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करू आणि आमच्या विक्रेता-वितरक नेटवर्कचे प्रसारण करून निर्यात व्यापार वाढीसाठी प्रयत्न करू.’

युनियन बजेटमध्ये करण्यात आलेली घोषणा ज्यामध्ये अक्षय उर्जा विशेषतः सौर ऊर्जेवर लक्ष्य केंद्रित करत असून, ते कंपनीसाठी फायदेशीर राहील. यावेळी कुसुम योजनेची घोषणा केली, ज्यामध्ये १७.५ लाख डीजल पंप आणि तीन कोटी शेतीमध्ये उपयोगी पंप यांना येणाऱ्या १० वर्षात सोलर पंपात परावर्तित करण्याचे उद्धिष्ट आहे. कुसुम योजना ही दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे लक्ष्य सोलर पंप आणि सोलर उत्पादनात वाढ करणे असून, प्रारंभिक बजेटनुसार ५० हजार कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link