Next
गुर्जर यांचा १२ कलमी कार्यक्रम जाहीर
प्रेस रिलीज
Monday, November 13 | 02:26 PM
15 0 0
Share this story

रवींद्र गुर्जरपुणे : बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र गुर्जर यांनी १२ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यातील काही उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.  

‘महाराष्ट्रामधील १२ कोटी, देशातील इतर राज्यांतील म्हणजेच बृहन्महाराष्ट्रातील अडीच कोटी आणि परदेशांतील ५० लाखांहून अधिक मराठी बांधवांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे उपक्रम निश्चित उपयुक्त ठरतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गुर्जर यांचा १२ कलमी कार्यक्रम असा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित मिळावा म्हणून पिटीशन दाखल करणार. बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्थांचे योगदान महाराष्ट्रातील आणि विदेशातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचावे आणि त्याची दखल घेतली जावी यासाठी विशेष उपक्रम राबवणार. बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संस्थांना महाराष्ट्र सरकारचे दरवर्षी अनुदान मिळावे म्हणून सरकार दरबारी आवाहन आणि विशेष प्रयत्न करणार. ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन आणि संकेतस्थळांची निर्मिती. चांगले अनुवादक आणि नवीन युवा लेखक निर्माण व्हावेत म्हणून कार्यशाळा आणि मार्गदर्शन; तसेच महाविद्यालयांमध्ये विशेष उपक्रम राबवणार. दुर्गम ग्रामीण भागांत आणि शहरातील सेवावस्त्यांसह सर्वत्र सहकारी तत्त्वावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ ग्रंथवितरण व्यवस्थेची निर्मिती. सरकार आणि साहित्य संस्था यांमध्ये समन्वय राहावा म्हणून विशेष उपक्रम. लेखक आणि वाचक, विशेषतः युवा पिढीला साहित्याबरोबर थेट जोडून घेण्यासाठी उपक्रम. विविध साहित्यिक उपक्रम, पुरस्कार, शिष्यवृत्ती आणि देश विदेशातील विविध संमेलनांची सर्वांना माहिती व्हावी यासाठी सोशल मीडियावर व्यवस्था निर्मिती. वृद्ध आणि गरजू साहित्यिकांना मदत देण्यासाठी गंगाजळीची निर्मिती. नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य आणि पुस्तकांच्या किंडल आणि ई बुक आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी लेखकांना आणि प्रकाशकांना मार्गदर्शन. लेखकांच्या मानधनावर जीएसटी लागू करण्याच्या सरकाराच्या निर्णयावर पुनर्विचार करावा म्हणून याचिका दाखल करणार.

‘संमेलनाध्यक्षपदाच्या विधायक व्यासपीठावरून अधिक व्यापक प्रमाणात हा १२ कलमी कार्यक्रम राबविण्याचा मानस असून त्यासाठी मराठी बांधवांनी आपल्या सूचना आणि कल्पना इ-मेल, व्हॉटसअप किंवा फेसबुकवर पाठवाव्यात,’ असे आवाहन गुर्जर यांनी केले आहे.

संपर्क :

रवींद्र गुर्जर  
मोबाइल : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com
वेबसाइट : https://www.ravindragurjar.com/
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link