Next
गुंफण गुणगौरव पुरस्कार जाहीर
रविवारी पुरस्कार वितरण
प्रेस रिलीज
Thursday, August 09, 2018 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

गुंफण गुणगौरव पुरस्कारांचे मानकरी
कराड :  मसूर येथील गुंफण अकादमीच्या वतीने दिले जाणारे गुंफण गुणगौरव पुरस्कार घोषित झाले आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या व्यक्तींना  हे पुरस्कार दिले जातात. 

या वर्षीच्या गुंफण गुणगौरव पुरस्कारासाठी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, कराड येथील संगम उद्योगसमूहाचे प्रमुख बाळासाहेब कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख सिध्देश्वर पुस्तके, गेवराई  येथील व्याख्याते रामानंद तपासे, मसूर येथील सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे व सातारा येथील वास्तुशास्त्र अभ्यासक नेहा शहा यांची निवड करण्यात आली आहे.रविवारी, दि. १९ ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमात सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत’, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.

‘पुरस्कारासाठी निवड केलेले कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या कारकिर्दीत कराड अर्बन बँकेची चौफेर प्रगती झाली असून, सामाजिक कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान दिले आहे. कराडच्या संगम उद्योग समुहाचे प्रमुख बाळासाहेब कुलकर्णी यांनी आजवर उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ते कराडच्या शिक्षण मंडळाचे चेअरमन असून, स्व. मधुआण्णा कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आहेत. सातारा जिल्ह्यातील टकले बोरगावचे सिध्देेश्वर पुस्तके हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख असून, राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नां ची सोडवणूक करून, त्यांचे चांगल्या प्रकारे संघटन करण्याचे काम ते करीत आहेत.  गेवराई, जिल्हा बीड येथील रामानंद तपासे हे व्याख्याते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असून, व्याख्यानाच्या माध्यमातून ते लोकप्रबोधन करत आहेत, तर मसूर येथील सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे यांनी आजवर सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. नोकरीच्या शोधात मुंबईला गेल्यावर शिवडी नाक्यावर रोजगार शोधताना अनेक अनोळखी चेहरे भेटले, स्वत:चा रंगकामाचा व्यवसाय शोधला, तो करताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अनेक बेरोजगारांना, गरजू, गरीबांना सहकार्य करून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे त्यांनी काम केले. सातारा येथील नेहा शहा यांनी सिंबॉयोसिस पुणे येथून व्यवस्थापन शास्त्राची पदवी संपादन करून शास्त्रशुध्दपणे वास्तुशास्त्रासंबंधी अभ्यास केला. त्या ज्ञानाचा उपयोग त्या समाजासाठी करत असून, त्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे’, अशी माहितीही चेणगे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ahire G.G. About 343 Days ago
समाजातील चांगल्या व्यक्तींची निवड केली त्यांच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते आमच्या शिक्षण मंडळ परिवारातील आदरणीय चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांची abhinndniy निवडझाली त्या बद्दल त्रिवार अभिनंदन व आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा
0
0
amit kambire About 344 Days ago
गर्वच नाही तर अभिमान वाटतो भाऊ आम्हाला तुमचा...राखेतुन शुन्य आणि शुन्यातुन विश्व निर्माण केले भाऊ तुम्ही. सलाम तुमच्या कर्तुत्वाला. नावातच तुमच्या कल्याण आहे त्यामुळेच तुमच्या सानिध्यात येणाऱ्या सर्वांचे कल्याण झाले,
1
0
Mमारुती वेताळ सर About 345 Days ago
सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन . भाऊ तुमच्या कार्याचा झालेला गौरव पाहून खूप आनंद झाला
2
0
Niteen nanavare About 345 Days ago
अभिनंदन भाऊ
1
0

Select Language
Share Link
 
Search