Next
नाशिक रोड येथे पाणी बचतीसाठी पत्रकांचे वाटप
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा पुढाकार
BOI
Monday, May 27, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:


नाशिक रोड भागात पाणी बचतीसंदर्भात पत्रके वाटताना मनसेचे नितीन धानापुणे, शशिकांत चौधरी संदीप आहेर, स्वप्नील विभांडीक, दीपक बोराडे, विजय सूर्यवंशी, स्वप्नील शिंदे, आशिष सांगळे आदी.

नाशिक : सध्या महाराष्ट्र भीषण पाणी टंचाईला सामोरा जात असल्याने पाणी बचतीविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) नाशिक रोड परिसरात पाणी बचतीसंदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.

सध्या सर्वत्र दुष्काळ पडला असून, या परिस्थितीत पाणी हेच जीवन आहे याची प्रचिती यायला लागली आहे. आज अनेक ठिकाणी प्यायला पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या असून, जनावरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तेथे तरी पाण्याचा अपव्यय करू नये व योग्य वापर करावा या उद्देशाने ‘मनविसे’चे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत चौधरी आणि नाशिक रोड अध्यक्ष नितीन धानापुणे, जिल्हा सरचिटणीस संदीप आहेर, स्वप्नील विभांडीक, दीपक बोराडे, विजय सूर्यवंशी, स्वप्नील शिंदे, आशिष सांगळे यांच्यासह ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी नाशिक रोड भागात पत्रके वाटायला सुरुवात केली आहे.


या पत्रकात दररोज गाड्या धुवू नये, गाडी धुवतांना बादलीत पाणी घ्यावे, ओट्यावर पाण्याचा सडा मारू नये, पाण्याचा नळ विनाकारण चालू करू नका, सार्वजनिक नळांना तोट्या बसवा, सोसायट्यांचे गळके पाइप बदला, घराबाहेर जाताना नेहमी नळ बंद केला आहे की नाही हे बघत जा, आंघोळ करताना शॉवरचा वापर न करता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करावी, धुण्याचे पाणी, भांडे घसल्याचे पाणी फेकून न देता झाडांना पाणी टाकावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्रकांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले असून, नागरिकांनी पाणी जपुन वापरू, अशी ग्वाही या वेळी दिली.

 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nitin dhanapune About 113 Days ago
धन्यवाद.👍
0
0
shashikant chaudhari About 113 Days ago
धन्यवाद
0
0

Select Language
Share Link
 
Search