Next
‘वृक्षलागवड लोकचळवळ बनावी’
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
प्रेस रिलीज
Tuesday, June 04, 2019 | 03:27 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘पुणे विभागाचे वृक्ष जगविण्याचे प्रमाण ८६ टक्के ही समाधानाची बाब आहे. या वर्षीचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल. तथापि वृक्षलागवड ही लोकचळवळ बनावी,’ अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत व्यक्त केली. आमदारांच्या अध्यक्षतेखाली विधानसभानिहाय समित्या स्थापन करून ही मोहीम अधिक व्यापक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने पुणे विभागाची आढावा बैठक तीन जून २०१९ रोजी वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अमर साबळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत परिचारक, राहुल कुल, आमदार मेधा कुलकर्णी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘पुणे विभागात १०.७८टक्के वनक्षेत्र आहे. एक जुलै २०१६पासून वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली. त्यावेळी दोन कोटींचे उद्दिष्ट होते; पण २.८३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता आपण ३३ कोटींच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचलो आहे. ही मोहीम ९० दिवसांची असणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना दिलेले उद्दिष्ट निश्चितच पूर्ण करतील. जिल्हांतर्गत, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण विविध विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०९ नर्सरींमध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत.’


वन विभागातर्फे हरित सेना हा उपक्रम राबविण्यात येत असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक कोटी उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ६१ लाख लोकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. पुणे विभागाला २८ लाख ६६ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ११ लक्ष ९० हजार ६६६ लोकांनी आतापर्यंत सदस्यत्व स्वीकारले आहे.

वृक्षलागवडीची मोहिम अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने आमदारांच्या अध्यक्षतेखाली विधानसभानिहाय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रीन व्हिलेज, ग्रीन आर्मी, ग्रीन स्कूल असे उपक्रम राबवित असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य प्रकल्पांसाठी वृक्ष तोडली जातात; परंतु त्या प्रमाणात लावण्याची जबाबदारीदेखील निश्चित केली आहे. जी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करेल, त्यावर दंड व शिक्षा करण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

‘ही मोहीम आता चळवळ बनली आहे. देशात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकविला असून, बहुउपयोगी वनस्पती म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बांबू लागवडीकडेही वनविभागाने लक्ष दिले आहे. यासाठी मागच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एक २९० कोटींची तरतूद केली होती. बांबू व्यवसायासून रोजगार तर मिळतोच, पण ठिकठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. बांबूची नर्सरी तयार करण्याबाबत विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत. हरीत महाराष्ट्र या उपक्रमात सामाजिक संस्थांनी विशेष सहभाग नोंदविला आहे. उद्योजकांनी यासाठी विशेष योगदान दिले आहे,’ अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. 

वनसंपदेचे महत्त्व विशद करताना ‘वन है तो जल है, जल है तो कल है’, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, ‘मनुष्याच्या उत्तम भविष्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व ओळखून या अभियानात सर्वांनी स्वत: सहभागी होऊन इतरांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे; तसेच वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण करायला हवे. वनविभागाचे काम चांगल्या प्रकारे करणाऱ्या जिल्ह्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही.’

प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले, ‘राज्य शासनाने सन २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत ५०कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या वर्षी एक जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यांत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे.’ 

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागाच्या पाच कोटी ४७ लाख ५१ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केल्याचे सांगून या अभियांनांतर्गत प्रगतीची माहिती दिली. पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्वेता सिंघल, डॉ. राजेंद्र भोसले, दौलत देसाई, अभिजीत बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी या अभियानाअंतर्गत झालेल्या व नियोजित कामाची माहिती दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search