Next
माझी जीवनगाथा
BOI
Tuesday, June 04, 2019 | 10:08 AM
15 0 0
Share this article:

प्रबोधनकार ठाकरे यांनी सत्यशोधक चळवळीच्या विचारांच्या प्रसारासाठी ‘प्रबोधन’ हे नियतकालिका प्रकाशित व संपादित केले. त्यातूनच ‘प्रबोधनकार’ ही पदवी त्यांना मिळाली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील आठवणी ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातून सांगितल्या आहेत. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनकारांच्या रोखठोक, रांगड्या व भडक भाषेचा अनुभव यातून मिळतो. त्या काळच्या सामाजिक पद्धती, रूढींना विरोध करण्याची धमक ते दाखवत असत. त्यांची आजी ‘बय’ ही बेडर अन् बंडखोर समाजसेविका होती. अस्पृश्यता पाळणे तिच्या गावी नव्हते. प्रबोधनकारांचे वर्तनही तसेच असे, याचे दाखले या आठवणींतून मिळतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वर्तमानपत्रे वाचत असल्याने आपली स्मरणशक्ती तेज झाल्याचेही ते नमूद करतात. प्रबोधनकारांचा जन्म, गाव, आडनाव, कुटुंब, व्यवसाय, आर्थिक स्थिती, त्यांचे स्वतःचे छंद, नोकरी-व्यवसाय, नाट्य कारकीर्द यांची माहिती या पुस्तकातून मिळते. त्या काळच्या सामाजिक, राजकीय स्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे व त्यांचा त्यातील सहभाग, भूमिकाही स्पष्ट केली आहे. शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांच्या आठवणी, त्यांच्याविषयीची मतेही त्यांनी उघडपणे मांडली आहेत.

पुस्तक : माझी जीवनगाथा 
लेखक : प्रबोधनकार ठाकरे
प्रकाशक : नवता बुक वर्ल्ड
पृष्ठे : ५११ 
मूल्य : ४०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकाचा अधिक सविस्तर परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search