Next
वंचित मुलांनी पाहिली शिवजन्मभूमी
प्रेस रिलीज
Monday, December 24 | 01:26 PM
15 0 0
Share this story



पुणे : ताडीवाला रोड येथील श्री समर्थ श्रीपती बाबा जनता प्राथमिक विद्यालयाच्या ६० मुलांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. गरीब घरातील या मुलांच्या शैक्षणिक सहलीचा सर्व खर्च सम्यक ट्रस्टतर्फे करण्यात आला. शिवनेरी किल्ला आणि परिसरात मुलांनी सहलीचा आनंद लुटला.   

२१ डिसेंबरला सकाळी ही सहल शाळेतून निघाली. या वेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, मुख्याध्यापक महादेव कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी जानराव म्हणाले, ‘ज्या मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा ६० विद्यार्थ्यांच्या सहलीचा संपूर्ण खर्च सम्यक ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. सहलीला जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहून समाधान वाटले. या मुलांनाही शैक्षणिक सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी हा उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आला.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link