Next
निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
BOI
Friday, April 12, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या तयारीचा गुरुवारी (११एप्रिल) आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस मावळ लोकसभा मतदार संघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग, शिरुरचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक एस. हरीकिशोर, पोलीस ऑब्झर्व्हर आभासकुमार, मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. एम. रानडे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, समन्वय अधिकारी नंदिनी आवडे, अजित रेळेकर, महेश आव्हाड, दिलीप गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत वेगवेगळ्या माहिती-तंत्रज्ञान साधनांचा वापर करण्यात येत आहे, त्यानुसार निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.


‘दिव्यांग मतदारांवरही या वेळी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, एकही मतदार सुटता कामा नये, हे लक्षात घेऊन मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील,’ असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत सी-व्हीजील अॅप, एक खिडकी योजना, टपाली मतपत्रिका, वेब कास्टींग, सूक्ष्म निरीक्षक, निवडणूक खर्च देखरेख आदींची माहिती देण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैध शस्त्रजप्ती, कायदा व सुव्यावस्था याबद्दलची माहिती दिली. 

‘जिल्ह्यातील निवडणूक तयारी उत्तम दिसत असून, निवडणुका शांत आणि नि:पक्ष वातावरणात पार पडतील,’ असा विश्वास निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search