Next
संजय लीला भन्साळी बॉलीवूडला देणार दोन नवीन चेहरे
‘मलाल’मधून दिसणार शर्मिन सेगल आणि मिझान यांची केमेस्ट्री
BOI
Tuesday, May 21, 2019 | 01:50 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी हे आपल्या आगामी ‘मलाल’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये दोन नवीन चेहरे लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची भाची शर्मिन सेगल आणि अभिनेता जावेद जाफरी याचा मुलगा मिझान या दोघांची केमिस्ट्री ‘मलाल’मधून दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

मराठी मुलगा आणि उत्तर भारतीय मुलगी यांची लव्ह स्टोरी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. ‘टिंग्या’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भन्साळींबरोबर भूषण कुमार, किशन कुमार आणि महावीर जैन यांनी एकत्रित या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारीही भन्साळी यांनीच घेतली आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे मुंबईच्या एका चाळीत चित्रपटाचे कथानक घडते. सुरुवातीला एकमेकांचा तिरस्कार करत असलेले नायक-नायिका पुढे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुन्हा तिरस्कार करू लागतात, अशी सरधोपट कथा असल्याचा अंदाज येतो. मराठी मुलगा दाखवला असल्याने गणेशोत्सव, होळी अशा मराठमोळ्या सणांवर आधारित गाणी चित्रपटात आहेत. मराठी दाखवलेल्या ‘मिझान’च्या तोंडी अनेक मराठी संवाद घालण्यात आले आहेत, मात्र हे दोघेही हिंदीभाषिक असल्याने ते तेवढे अपील होताना दिसत नाहीत. येत्या २८ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हा एक बिग बजेट सिनेमा असणार, यात अर्थातच शंका नाही. शर्मिन ही संजय लीला भन्साळी यांची बहिण बेला सेगल यांची मुलगी आहे. बेलाने संजयच्या अनेक सिनेमांचे संकलन केले आहे. त्यांचे पती आणि शर्मिनचे वडील हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मोहन सेगल यांचे पुत्र आहेत. १९७०मध्ये त्यांनी ‘सावन भादों’ या सिनेमातून अभिनेत्री रेखा यांना लॉन्च केले होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search