Next
सही रे सही! ८६ वर्षांच्या आजोबांनी जोपासला स्वाक्षरीसंग्रहाचा छंद!
नाशिकमधील नारायण करमासे यांची गोष्ट
BOI
Saturday, August 17, 2019 | 05:56 PM
15 0 0
Share this article:

नारायण करमासेनाशिक : छंद माणसाचे जीवन समृद्ध करतात, याचा प्रत्यय नाशिकमधील ८६ वर्षांचे नारायण रामचंद्र करमासे यांच्याकडे पाहिल्यावर येतो. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी महनीय व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचा संग्रह करण्याचा छंद जोपासायला सुरुवात केली. आजच्या घडीला त्यांच्याकडे हजारहून अधिक व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि त्यांच्याकडच्या पाच मोठ्या वह्या या सह्यांनी भरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सही त्यांच्या संग्रहात आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन म्हणजे नातवंडांमध्ये रमण्याचे दिवस! पण करमासे यांनी मात्र तेवढ्यावरच समाधान मानले नाही. केंद्र सरकारच्या गांधीनगर प्रेसमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी महनीय व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला. त्यातून ते जीवनाचा आनंद घेत आहेत. प्रसिद्ध व्यक्तीची स्वाक्षरी घेण्यासाठीची त्यांची धडपड व चिकाटी एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. 

दहा वर्षांत त्यांनी हजारहून अधिक व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यांचा संग्रह केला असून, या सह्यांनी पाच मोठ्या वह्या भरल्या आहेत. त्यात राजकीय नेते, अभिनेते, कलावंत, शास्त्रज्ञ, डॉक्टर, शिक्षण, अध्यात्म क्षेत्रातील व्यक्ती, आजी-माजी पोलिस आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार अशा विविध क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे. प्रत्येक स्वाक्षरीमागची पार्श्वभूमीही ते संग्रह पाहणाऱ्याला उत्साहाने सांगतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेला फोटोविद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, आचार्य किशोरजी व्यास, माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर अशा अनेक महनीय व्यक्तींच्या सह्या करमासे आजोबांच्या संग्रहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरीही आपल्या संग्रहात असावी, म्हणून करमासे यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत दिल्लीहून एक पत्र आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले छायाचित्र त्यांना मिळाले. 

‘मान्यवर व्यक्तींची स्वाक्षरी घेताना समोरची व्यक्ती माझ्या वयाचा मान ठेवून चरणस्पर्श करते, तेव्हा हा छंद जोपासण्यास बळकटी मिळते. वृद्धापकाळात मला व्याधींनी ग्रासले नाही. लोकसंपर्क वाढवणारा हा छंद मी अखेरच्या श्वासापर्यंत जोपासणार आहे,’ असे करमासे सांगतात. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
गजानन पटवर्धन. About 6 Days ago
श्री. कर मासे काका, आपल्या स्वाक्षरी छंदा विषयी माहिती वाचली, खूपच छान आणि माहिती पूर्वक आपले काम करत आहात, मी सुद्धा स्वाक्षरी संग्राहक आहे, प्रयत्क्ष भेटून घेतो. आपल्या ला शुभेच्छा,
0
0
Yogiraj Dr. SARVESH SONI About 6 Days ago
Congratulations. Pl provide me his contect no. With Regards, Yogiraj Dr.Sarvesh Soni,Nashik Limca Record Holder 9822543355
0
0
Suresh Dingore About 21 Days ago
खुप छान. आनंदी, प्रसन्न व्यक्तिमत्व. छंद जोपासन्याची हौस व जिद्दीला सलाम.
1
0

Select Language
Share Link
 
Search