Next
‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये शिरोळे यांचे क्लीन बसेसवर सादरीकरण
BOI
Thursday, October 25, 2018 | 05:49 PM
15 0 0
Share this story


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक सिद्धार्थ शिरोळे नुकत्याच सिंगापूर येथे झालेल्या ‘ग्लोबल मास ट्रान्सिट’मध्ये क्लीन बसेसबाबत महाराष्ट्राचे धोरण स्पष्ट केले. या परिषदेत ‘क्लीन बसेस इन सिटीज इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक या नात्याने पुणे शहर व राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर आपली मते मांडली. त्यांनी सध्या काळाची गरज असलेल्या इलेक्ट्रिक बसेस पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्यासाठी कशा महत्त्वाच्या आहेत आणि हे महत्त्व ओळखून मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे त्यांना चालना देत आहेत ही माहिती उपस्थितांना दिली.


या विषयी अधिक माहिती देताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘आज भारतात ऑईल क्राईसेस हा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इलेक्ट्रिक बसेसच्या वापराबद्दल आग्रही आहेत. केवळ आग्रही नाही तर त्याची अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात राज्यात पाच हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा प्रयत्न होत आहे. यापैकी दोन हजार बसेस तर केवळ पुणे शहरात असतील. याचीच सुरुवात म्हणून पुण्यात आम्ही पुणे महानगर प्रादेशिक परिवहन मंडळाच्या माध्यमातून पहिल्या १५० बसेसची निविदा काढली असून लवकरच या आधुनिक, पर्यावरण पूर्वक इलेक्ट्रिक बस शहरात धावताना दिसतील. विशेष म्हणजे आजपर्यंतची भारतातली इलेक्ट्रिक बसची ही सर्वांत मोठी निविदा आहे. हे बदल होत असताना सार्वजनिक बस सेवा ही सामान्य प्रवासी नागरिकांना परवडणारी असावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसी इलेक्ट्रिक बसेस या नॉन एसी बसेसच्या किमतीत प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय सार्वजनिक बस वाहतूक सेवेसाठी आवश्यक त्या बॅटरी, मोटर यांचे उत्पादन भारतात व्हावे यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे.’

एशिया पॅसिफिक खंडामध्ये सार्वजनिक वाहतुक कोंडी, अपघात, प्रदूषण यांचा खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून सीएनजी, इलेक्ट्रिक, हायड्रोजन व हायब्रीड बसेसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबरोबरच या विषयात ज्या सार्वजनिक, खासगी संस्थांनी भरीव कामगिरी केली आहे, त्यांनी त्यांचे अनुभव व त्यांनी केलेले प्रयोग ग्लोबल मास ट्रान्सिट परिषदेत मांडले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link