Next
प्रोजेक्ट मॅनेजमेंट रिजनल कॉन्फरन्स
प्रेस रिलीज
Wednesday, March 14, 2018 | 01:16 PM
15 0 0
Share this story

अमित जैन, राजाराम बी राव, गिरीश कदम, स्टीफन टाउन्सेंड, तेजस सुरा, राज कलाडी

पुणे : डिजिटल क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदलामुळे व्यवसाय व समाज यांच्यावर चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम होणार आहेत. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा तंत्रज्ञानामुळे होणारा ऑटोमेशनचा विकास आणि अशा तंत्रज्ञानांमध्ये सातत्याने होत असलेली प्रगती, यामुळे उत्पादकता कमालीची वाढणार आहे आणि त्याच वेळी, नोकऱ्या, कौशल्ये, पगार व कामाचे स्वरूप याविषयी प्रश्नचिन्हे निर्माण होणार आहेत. हे विचारात घेऊन, पीएमआय पुणे, डेक्कन शाखेने १२ मार्च रोजी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून व्यवसायातील परिवर्तन साध्य करणे’ या विषयावरील चौथ्या ‘पीएमआय प्रोजेक्ट इंडिया प्रोजेक्ट मॅनेजमेंट रिजनल कॉन्फरन्स’चे पुणे येथे आयोजन केले होते.

व्यवसायामध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट तंत्रांचा कसा वापर करता येईल, तसेच प्रदेशाच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी कंपनी कशी मदत करू शकेल, हे परिषदेत अधोरेखित करण्यात आले. नव्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी व प्रगती करण्यासाठी कंपन्यांमध्ये गरजेचे असलेले परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आवश्यक धोरणांवर चर्चा करण्यासाठी विचारवंत, उद्योगातील तज्ज्ञ व प्रोफेशनल यांना एकत्र आणणे हे परिषदेचे उद्दिष्ट होते. परिषदेच्या निमित्ताने, विविध क्षेत्रांतील प्रोजेक्ट लीडर्स व प्रॅक्टिशनर असलेल्या चारशेहून अधिक सहभागींना नेटवर्किंगची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या उद्दिष्टाविषयी बोलताना, प्रोजेक्ट मॅनेमजेंट इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकिय संचालक राज कलाडी यांनी सांगितले, ‘जग अधिकाधिक जवळ येत आहे. दीर्घ कालावधीकडे लक्ष ठेवून, अल्प कालावधीत निर्माण होणारी अनिश्चितता हाताळण्यासाठी निर्णय घेण्याच्या बाबतीत जुनी विचारसरणी, मॉडेल व प्रक्रिया यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या परिवर्तन करण्याच्या क्षमतेचा योग्य प्रकारे वापर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, ही परिषद योग्य वेळी आयोजित केली जात आहे.’

परिषदेचे अध्यक्ष व पीएमआय पुणे, डेक्कन शाखेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम राव बी. म्हणाले, ‘अनेक बदल होत असल्याचा व टिकाव धरण्यासाठी स्वतःमध्ये कमालीचे बदल करण्यासाठी कंपन्या धडपडत असल्याचा सध्याचा काळ आहे. पीएमआयमध्ये, ऑपरेशन्समुळे व्यवसाय चालवला जातो, पण प्रोजेक्टमुळे व्यवसायात बदल होतात, असे आमचे मत आहे. बदलांशी जुळवून घेण्यासाठी, व्यवसायिकांनी व प्रोजेक्ट प्रोफेशनलनी कालानुरुप निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी व मूल्य देण्यासाठी, बाजारहिस्सा टिकवण्यासाठी व विशेष धोरण, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अवलंबून व नेतृत्व याद्वारे स्पर्धेमध्ये सरस ठरण्यासाठी झटपट प्रतिसाद देणे व नावीन्य आणणे गरजेचे आहे. यासंदर्भात; या वर्षीच्या परिषदेचा भर प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून व्यवसायातील परिवर्तन साध्य करणे, यावर असावा असे आम्हाला वाटले.’

पीएमआय, नेटवर्क प्रोग्रॅम्सचे संचालक स्टीफन टाउनसेंड  म्हणाले, ‘परिषदेमध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे आणि भारताच्या भविष्याच्या दृष्टीने प्रोजेक्ट मॅनेजमेंट का महत्त्वाचे आहे, याविषयी जागृती वाढवण्यासाठी व आकलन करण्यासाठी भारतातील आमची टीम मोलाचे काम करत आहे, हेही उल्लेखनीय आहे. तुमचे पद प्रोजेक्ट मॅनेजर हे असेल, पण प्रत्यक्षात तुम्ही खऱ्या अर्थाने परिवर्तनकार आहात.’

या परिषदेत, व्यवसायात बदल घडवण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमुळे कशी मदत होऊ शकते, याविषयी विचारांची व अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी विविध उद्योगांतील व क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष सुरेश नाईक, सुपर थर्टी प्रोग्रॅमचे संस्थापक आनंद कुमार, आंतरराष्ट्रीय वक्ते स्टीफन टाउसेंड, थायसनक्रुप इंडस्ट्रिअल सोल्यूशन्सचे कार्यकारी संचालक पी. जी. वारे, कमर्शिअल - मर्स्कचे उपाध्यक्ष श्रीराम नारायणसामी, व मदर्स रेसिपीचे उपाध्यक्ष मिलिंद मुतालिक परिषदेत सहभागी झाले होते. या वर्षी विशेष वक्त्या होत्या, सर्व महिला असलेल्या भारतातील पहिल्या लॉजिस्टिक्स सर्व्हिस कंपनीच्या संस्थापिका रेवती रॉय.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link