Next
‘देशाच्या रक्षणासाठी सज्ज व्हा’
ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांचे आवाहन
BOI
Thursday, November 29, 2018 | 02:21 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : ‘२१७ प्रशिक्षणार्थींची आणखी एक तुकडी तोफखाना विभागाच्या प्रशिक्षणादरम्यान मिळवलेली कौशल्य व क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी सज्ज झाली आहे. युद्ध व निर्णायक स्थितीमध्ये आपल्या प्राणाची चिंता न करता तोफखाना विभागाचे सर्वत्र ‘इज्जत व इकबाल’ हे ध्येयवाक्य कायम ठेवण्यासाठी तुम्ही सिद्ध राहा. सर्वांनी एक संघभावना जोपासत देशाची मान उंचावण्यासाठी बलिदान देण्यासाठी नेहमी सज्ज राहा,’ असे आवाहन स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांनी केले.

आर्टिलरी सेंटरच्या नाशिक रोड येथील तोफखाना विभागातील २१७ प्रशिक्षणार्थींची तुकडी अकरा महिन्यांच्या अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. त्यांचा शपथविधी सोहळा येथील उमराव सिंग परेड मैदानावर विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी ब्रिगेडियर बिंद्रा बोलत होते. देशाच्या विविध भागांतून आलेल्या जवानांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथील सैन्य दलातील प्रशिक्षण केंद्र प्रसिद्ध आहे.या वेळी या जवानांनी आपले कुटुंबीय व मान्यवरांसमोर तोफेचे लोडिंग व अनलोडिंग करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर बिंद्रा यांच्यासह उपकमांडंट विकास चौधरी यांनी प्रशिक्षणार्थींच्या चारही तुकड्यांची पाहणी करून त्यांनी दिलेल्या मानवंदनेचा स्वीकार केला आणि त्यांचे अभिनंदन केले.  

शपथविधी सोहळ्यानंतर आपला मुलगा देशसेवेसाठी पाठविल्याबद्दल या जवानांच्या माता-पित्यांचाही या वेळी पदक देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान होत असताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. आपल्या मुलाला अनेक दिवसांनंतर भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साहिल कुमार यांना बेस्ट इन ड्रिल, गौरव कुमार यांना बेस्ट इन फिजिकल ट्रेनिंग, अनिकेत यादवना बेस्ट इन वेपन ट्रेनिंग, आनंदराव वांगेकर बेस्ट इन गनर्स, राहुल बेस्ट इन टीए, दासिया श्रीनू बेस्ट इन ऑपरेशन, सोनू बेस्ट इन ड्राइवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, याकूब ओरान बेस्ट इन स्टीवर्ड, तर अनिकेत यादव यांना ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मर म्हणून सन्मानित करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search