Next
‘हास्ययोगामधून सकारात्मकता वाढते’
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 10:58 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘हसण्यातून, हास्ययोगातून जीवनात सकारात्मकता वाढते. म्हणून हास्याला आपलेसे करावे,’ असे आवाहन लाफ्टरयोगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र अध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी केले.

सहा मे रोजी असलेल्या जागतिक हास्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सिनर्जी हॉलिडे व्हिलेज आणि सिनर्जी फाउंडेशन आयोजित ‘सिनर्जी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम तीन मे रोजी सायंकाळी एरंडवणे येथील सिनर्जी कार्यालयाच्या सभागृहात झाला. या वेळी ‘लाफ्टरयोगा इंटरनॅशनल’च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिनर्जी हॉलिडे व्हिलेजचे संचालक राजेंद्र आवटे यांनी टिल्लू यांचा सत्कार केला.

टिल्लू म्हणाले, ‘हसणे ही चुकीची गोष्ट करतो आहे, असे वर्षानुवर्षे समाजाला वाटत आहे. महिलांच्याही हसण्यावर निर्बंध होते. टवाळांना विनोद आवडतो, असे समजण्याची रित होती. प्रत्यक्षात हसणे ही मनुष्याला मनुष्याशी जोडणारी अफलातून गोष्ट आहे. हसणे आपले नाते समृद्ध करते. जगण्यातील सकारात्मकता वाढते. बदलत्या जीवनशैलीमुळे मनोकायिक विकार समाजात वाढत आहेत. वेगवेगळ्या ताणामुळे मने मारली जात आहेत. अशा वेळी हसण्याला आपलेसे केले पाहिजे.’

‘हसणे हा व्यायाम आहे आणि हसण्यातून आनंद वाढतो. या आनंदाचा प्रसार करत राहिले पाहिजे. मनोवृत्ती आनंदी केली पाहिजे. मनाच्या फिटनेससाठी हास्ययोग उपयुक्त ठरतो,’ असे ही टिल्लू यांनी या वेळी सांगितले.

या प्रसंगी कार्पोरेट क्षेत्रात लाफ्टर थेरपीच्या उपयोगाची माहिती देखील टिल्लू यांनी दिली. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. सागर कटकमवार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link