Next
‘रंगूनवाला’मध्ये कारगिल विजय दिवस साजरा
प्रेस रिलीज
Friday, July 27 | 12:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीच्या  एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅंड रिसर्च यांच्या वतीने १९वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कारगिल युद्धात विजय मिळवून देणार्‍या वीरांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कारगिल युद्धातील वीर कर्नल विजय सिंग जाधव (निवृत्त) आणि कर्नल किरण वझे (निवृत्त) यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी या दोघांनीही आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

आझम कॅंपसच्या हाय टेक हॉलमध्ये इन्स्टिट्यूटच्या प्रथम आणि तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link