Next
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा
प्रेस रिलीज
Friday, February 01, 2019 | 01:35 PM
15 0 0
Share this story



पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘थ्री-डी प्रिंटिंग’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिओक्लिड थ्री-डी प्रिंटिंग सोल्युशन्सच्या संचालक पूर्वा कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

भारती विद्यापीठ अभिमत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव अध्यक्षस्थानी होते. शिक्षण, संशोधन, उद्योग क्षेत्रांतील ४७ मान्यवर या कार्यशाळेत सहभागी झाले होते. भारती विद्यापीठाच्या कात्रज कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा झाली. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख डॉ. के. बी. सुतार यांनी प्रास्ताविक केले.



या वेळी माहिती देताना कुलकर्णी म्हणाल्या, ‘थ्री-डी प्रिंटिंगला उत्पादन, औषध निर्मिती, आर्किटेक्चर, डिझाइन, कस्टम क्षेत्रांत मागणी असून, त्याचा वापर सुरू झाला आहे. आगामी काळात या तंत्रज्ञानाला मोठे भवितव्य असून, त्याचा अभ्यास अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.’

डॉ. भालेराव म्हणाले, ‘शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल घडत असून, या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. थ्री-डी तंत्रज्ञान मानवी जीवनात उपयोगी ठरण्यासाठी संशोधन आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांना जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बदलांसाठी प्रशिक्षित करणारे उपक्रम जाणीवपूर्वक करीत आहोत.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link