Next
अर्जुन देशपांडेला आशियातील सर्वोच्च पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, July 23, 2019 | 12:06 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : शहरातील अर्जुन राजेश देशपांडे याची ‘यंगेस्ट स्टुडंट इंटरप्रेनर आशिया २०१९’ या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली असून, नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारोहात त्याचा यंगेस्ट स्टुडंट इंटरप्रेनर म्हणून गौरव करण्यात आला.

ठाणे शहरात राहणारा अर्जुन हा केवळ १७ वर्षांचा असून, त्याने जनरीक आधार ही सर्वसामान्य माणसांना परवडणारी औषधांची दुकाने ठाणे शहर परिसरात सुरू केली. सर्वसामान्य नागरीकांना ६० टक्के कमी दरात व परवडणाऱ्या दरात औषधे मिळू लागल्याने अर्जुनने जनरिक आधार ठाणे मुंबईसह देशभरात मेडिकल स्टोअर्सची रिटेल आउटलेट सुरू करण्याची योजना आखली व त्याला मूर्त स्वरूप येऊ लागले. त्याचीच दखल घेऊन भारतातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार त्याला देण्यात आला.

नवी दिल्लीत झी बिजनेस इंटरप्रेनर इंडिया व इंटरप्रेनर मॅगझीन यांच्यातर्फे जे डब्ल्यू मॅरियेट येथे अनेक प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्यात आशिया खंडातील २०० विविध व्यावसायिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून पहिल्या पाच जणांमध्ये अर्जुनची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रथम क्रमांकाने त्याचा गौरव करण्यात आला. अर्जुनच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच हा पुरस्कार लाभला आहे.

अर्जुनची आई आरती देशपांडे इंटरनॅशनल फार्मा व्यवसायात सेवा बजावत असून, अमेरिका, व्हियेतनाम, चीन, दुबई येथे होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय फार्मा परिषदेस अर्जुन आपल्या आईसमवेत जात असे. तेथील जनरिक औषधे कमी किंमतीत मिळत असल्याचे पाहून भारतातही ही औषधे उपलब्ध करून देण्याचे अर्जुनने ठरविले व त्याला त्याची आई आरती व वडील राजेश देशपांडे यांनी साथ दिली. त्यातून जनरिक आधारचे जाळे विणले गेले. अर्जुनचे वडील राजेश देशपांडे वाहतुक व्यवसायात असून, ठाणे सीकेपी संस्थेचे अध्यक्ष आहेत. हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्जुनचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search