Next
ऋत्विक फाउंडेशनतर्फे ‘स्वर-प्रभात’चे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, November 14, 2018 | 04:16 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत कार्यक्रमाविषयी माहिती देताना ऋत्विक फाउंडेशनचे प्रवीण कडले. शेजारी ऋजुता सोमण, संगीतकार आदिनाथ मंगेशकर, पंडित रघुनंदन पणशीकर.

पुणे : ‘ऋत्विक फाउंडेशन या संस्थेची स्थापना पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते होणार असून, या वेळी पंडितजींच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला जाणार आहे. १८ नोव्हेंबर २०१८ ला हा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी स्वर-प्रभात या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांची विशेष उपस्थिती असेल; तसेच पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या संगीताने या सोहळ्याची सांगता होईल,’ अशी माहिती ऋत्विक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडले यांनी दिली.या विषयी अधिक माहिती देताना ऋजुता सोमण कल्चरल अकादमीच्या संस्थापिका व ज्येष्ठ नृत्यांगना ऋजुता सोमण म्हणाल्या, ‘मेलाँज-म्युझिक अँड डान्स फेस्टिवल या संध्याकाळच्या मैफलीची सुरुवात अबोली अभ्यंकर-थत्ते आणि सानिका देवधर यांच्या वंदनेने होणार आहे. ऋजुता सोमण स्वत: एकल नृत्य प्रस्तुती करतील. पुरबायन चॅटर्जी यांचे सतार वादन होईल. त्यांना ओजस आढीया हे तबलासाथ करतील. कार्यक्रमाची सांगता पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या सुरेल स्वरसाधनेने होईल. सुप्रसिद्ध प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे. ही मैफल ऋत्विक फाउंडेशनने प्रायोजित केली आहे.’

या वेळी उपस्थित असलेले रघुनंदन पणशीकर म्हणाले, ‘प्रवीण कडले यांनी स्थापन केलेली ऋत्विक फाउंडेशन ही संस्था संगीत क्षेत्रातील सर्व कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय शास्त्रीय संगीत परंपरा कशी जपता येईल व ती नवीन पिढी पर्यंत कशी पोचवता येईल यासाठी ते कायमच प्रयत्नशील असतात.’

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
रविवार, १८ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी सात वाजता
स्थळ : एमइएस ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link