Next
‘सीईटी’तील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सत्कार
BOI
Thursday, June 06, 2019 | 03:52 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले. महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या सीईटी मार्गदर्शन केंद्रातील ४० विद्यार्थ्यांपैकी योगिता गावकर हिने ९८.०८ पर्सेंटाइल गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात सहा जून रोजी सकाळी सत्कार करण्यात आला.

योगिता गावकर

महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याने ९९.९८ पर्सेंटाइल मिळवले आहेत. महाविद्यालयातून पहिल्या आलेल्या योगिताला ९८.०८ पर्सेंटाइल मिळाले आहेत. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यार्थीही स्पर्धेत कुठेही मागे नाहीत, हे यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

यशश्री सारंग

योगितासोबत यशश्री सारंग (९५), शुभम सावंत (९४), स्वप्नज वाळिंबे (९०) आणि अनामिका जागुष्टे (९०) यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयात गेल्या १३-१४ वर्षांपासून सीईटी मार्गदर्शन केंद्र सुरू असून, त्यात महाविद्यालयातील प्राध्यापक मार्गदर्शन करतात. 

शुभम सावंत

या वेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, शालेय समिती अध्यक्ष उल्हास लांजेकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य सकपाळ, पर्यवेक्षक उरुणकर आदी उपस्थित होते. सीईटी केंद्र समन्वयक प्रा. महेश नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्वप्नज वाळिंबे

शिल्पा पटवर्धन म्हणाल्या, ‘कनिष्ठ महाविद्यालयात तीन ते साडेतीन हजार मुले शिकतात. त्यातील ४० जणांच्या बॅचमधून या विद्यार्थ्यांनी धवल यश मिळवले आहे. लहान स्वप्नापासून मोठ्या स्वप्नाकडे मेहनतीने यश मिळवत जा. संस्था, पालक व शिक्षकांना विसरू नका. आपल्यासोबत आणखी १० जणांना भाकरी करायला शिकवा, त्यांना नोकरी द्यायला शिका.’ 

अनामिका जागुष्टे

शालेय समितीचे अध्यक्ष उल्हास लांजेकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात टक्कर देता येईल एवढी मुले हुशार आमच्याकडे आहेत. त्यांचे कौतुक महत्त्वाचे आहे. ‘सीईटी’करिता अद्ययावत यंत्रणा, प्राध्यापकांचे बहुमूल्य योगदान लाभत आहे. प्रा. महेश नाईक व सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतल्याचे आज फळ मिळत आहे.’

सीईटी केंद्रात प्रा. नाईक, प्रा. मालशे, प्रा. सुयोग सावंत, प्रा. पोकळे, प्रा. कांदळकर, प्रा. दाते, प्रा. ठीक, प्रा. नागवेकर, प्रा. केळकर, प्रा. नांदगावकर, प्रा. लिंगायत, प्रा. पळसुलेदेसाई, प्रा. मालगुंडकर, प्रा. शिंगाडे मार्गदर्शन करतात. 

सीईटी केंद्र प्रशासकीय व्यवस्थापक रवींद्र कीर, अवधूत मयेकर, प्रसाद पटवर्धन यांचाही या वेळी उल्हास लांजेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनी मनोगतामध्ये महाविद्यालय व संस्थेची उज्ज्वल परंपरा सांगितली. तसेच सीईटी मार्गदर्शन केंद्राच्या वाटचालीबद्दलही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search