Next
‘एन्थुजिया’चे सर्वसाधारण विजेतेपद ‘सेंट विन्सेंट’ला
एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आंतरमहाविद्यालयीन महोत्सव
प्रेस रिलीज
Wednesday, December 19 | 03:51 PM
15 0 0
Share this story



पुणे : डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कॅम्प येथील सेंट विन्सेंट महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील ७२ महाविद्यालये या महोत्सवात सहभागी झाली होती.

'एन्थुझिया' महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व फॅकल्टी ऑफ मॅनेजजमेंटचे अधिष्ठाता डॉ. रवीकुमार चिटणीस, फॅकल्टी ऑफ मॅनेजजमेंटच्या, उपअधिष्ठाता डॉ. अंजली साने, 'एन्थुझिया' समन्वयिका आणि बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी आद्य, सहसमन्वयिका प्रा मृदुल वैद्य, तृतीय वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी नौमन शेख व सहकारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी या सगळ्या महोत्सवाचे संयोजन केले व प्रथम व द्वितीय वर्षाच्या मुलांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा लिमये, यश शेट्टी व धीरज परदेशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेल्या आठ वर्षांपासून ‘एन्थुझिया’ महोत्सव वर्षातून दोनदा आयोजित केला जातो. यात नृत्य, संगीत, बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, बॉक्स क्रीडा, स्कॅव्हेंजर हंट, ट्रेजर हंट, कुकिंग, वादविवाद स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, टग ऑफ वॉर अशा एकूण १७ पेक्षा अधिक प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असतो.

यंदा पुण्यातील ७२ महाविद्यालयांच्या एकूण एक हजार ३५० विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. एमआयटी महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशू दासवानी याने सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link