Next
चढ्या दराचे सोनेखरेदीवर सावट
BOI
Wednesday, April 18 | 06:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याला आपल्याकडे प्राधान्य दिले जाते. यात व्यावहारिक दृष्टिकोनापेक्षा परंपरेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे सोनेखरेदीसाठी शुभमुहूर्तालाही विशेष महत्त्व असते. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशीही आवर्जून सोनेखरेदी केली जाते. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणारे ग्राहक मात्र या वेळी दर चढे असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची शक्यता कमी आहे,’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

 ‘गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोन्याचा दर २८ ते ३० हजार रुपयांपर्यंत असणे योग्य वाटते. त्या दरम्यान भाव असते तर त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याला प्राधान्य दिले असते; पण आता दर ३२ हजारांवर आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांची सोनेखरेदी या वेळी कमी असेल. पाच ते दहा टक्क्यांनी खरेदीवर परिणाम होईल,’ असे मत कमोडिटी तज्ज्ञ आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’चे संचालक व सीईओ अमित मोडक यांनी व्यक्त केले. 

‘शुभमुहूर्तावर सोने खरेदी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आवर्जून, थोडेसे का होईना, सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद चांगला मिळेल, अशी आशा आहे, असे ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’चे अजित गाडगीळ यांनी सांगितले.

गेल्या वीस वर्षांमध्ये सोन्यातून मिळालेला परतावा बघितला, तर लक्षात येईल, की सोन्यातील गुंतवणुकीवरील परतावा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. गेल्या तीन वर्षांत सोन्यावरील परतावा कमी कमी होत गेल्याचे स्पष्ट होते. त्याआधी सोन्यावर साधारण १०.०५ टक्के परतावा मिळत असे. तो गेल्या तीन वर्षांत सरासरी ४.६८ टक्क्यांवर आलेला दिसतो. तसेच सोन्याचे दरही चढेच राहिले आहेत. कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक व्यापारयुद्ध यामुळे सोन्याच्या दराचा कल तेजीचाच राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी करताना त्यावरील परतावा कमी होत आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनेखरेदीचा विचार असेल, तर सध्या ते फारसे फायदेशीर नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

(सोनेखरेदी, सोन्यातील गुंतवणूक आदींसंदर्भातील अजित गाडगीळ आणि अमित मोडक यांचे मत जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link