Next
‘रत्नागिरी सरस २०१७’चे उद्घाटन
BOI
Saturday, December 23 | 05:41 PM
15 0 0
Share this story

सरस प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत.गणपतीपुळे (रत्नागिरी) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बचतगटांच्या ‘रत्नागिरी सरस २०१७’ या प्रदर्शनाचे उद्घाटन २३ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते झाले.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, रत्नागिरी पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, उपसभापती सुनील नावले, संगमेश्वर पंचायत समिती सभापती सारिका जाधव, ‘डीआरडीए’चे प्रकल्प संचालक व्ही. व्ही. पनवेलकर, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने ‘डीआरडीए’मार्फत दरवर्षी २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत गणपतीपुळे येथे ‘रत्नागिरी सरस’चे आयोजन करण्यात येते. महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि त्याच्यातील अत्मिविश्वास द्विगुणीत करण्यात हे प्रदर्शन मोलाची भूमिका बजावते. दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० बचतगट यामध्ये सहभागी होतात; मात्र यावर्षी यात तब्बल १२२ गट सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळ अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link