Next
‘मिनी कंट्रीमॅन’ भारतात सादर
प्रेस रिलीज
Wednesday, May 09, 2018 | 03:25 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन भारतात सादर करण्यात आली. चेन्नईतील बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर तयार झालेली दुसऱ्या जनरेशनची ऑल–न्यू मिनी कंट्रीमॅन पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. जून २०१८पासून या कारच्या डिलिव्हरीज सुरू होतील. दोन पेट्रोल व्हेरिएंटमध्ये मिनी कंट्रीमॅन कूपर एस आणि मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्ल्यूचा समावेश आहे, तर डिझेल व्हेरिएंटमध्ये मिनी कंट्रीमॅन कूपर एसडीचा समावेश आहे.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे प्रेसिडंट विक्रम पावाह म्हणाले, ‘ऑल-न्‍यू मिनी कंट्रीमॅन साहसासाठी निर्माण करण्‍यात आली आहे आणि ही कार शहरामधील फेरफटका ते कंट्री गेटवेज व लांबच्‍या प्रवासांसाठी अगदी योग्य आहे. सेकंड जनरेशन मिनी कंट्रीमनकार गाडी चालवण्याच्या अनुभवाला मजेसोबतच करिश्मा आणि वैयक्तिकपणाची जोड देत तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देत अप्रतिम ऑल–राउंडर ठरते. अर्बन वातावरणासाठी योग्‍य असलेल्‍या या कारमध्‍ये आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव, सुधारित इंटेरिअर्स आणि उत्‍तम कार्यक्षमता आहे. मिनी कंट्रीमॅनची रचना साहसासाठी करण्यात आली आहे आणि ही कार तुमच्या वीकेण्ड्सना साहसी मोहिमेत बदलून टाकेल. या कारसोबत प्रत्येक रस्ता एक नवी कथा रचतो. किना-यालगतचा सस्‍ता असो किंवा शहरातील वर्दळीचे रस्‍ते असो आता तुम्‍ही तुमच्‍यामधील साहसी वृत्‍तीला दाखवू शकता.’

नवी दिल्लीतील बर्ड ऑटोमोटिव्ह मिनीडीलरशीप येथे या कारचा अनावरण सोहळा पार पडला. या वेळी ‘मिनी’च्या नव्या व्यक्तिमत्त्वासोबतच ब्रँडचे सर्व पैलूंना जीवंत रूप देण्यात आले. नव्या ‘मिनी’ शोरूम डिझाइन कन्सेप्टमध्ये कार्यक्षमता, कल्पकता आणि दर्जा यांचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे. जागेच्या कल्पक वापराला नैसर्गिक साधनांच्या वापराची जोड देण्यात आल्याने ‘मिनी’चे अर्बन कल्पक व्यक्तिमत्त्व स्पष्ट होते. साधेसे, मात्र विरुद्ध रंगांमधील सजावटीमुळे अस्सलता आणि सुस्पष्टता निर्माण होते. ‘मिनी’चे महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अगदी त्यातील फर्निशिंगपासून लहानतील लहान बाबींमधील संपूर्ण स्टायलिंग संकल्पनेमुळे अधिकच झळाळून उठते. कारमधील या वातावरणामुळे प्रवाशांमधील संवाद वाढतो आणि एक उत्साही वातावरण तयार होते.

मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्ल्यू इन्स्पायर्डमध्ये जॉन कूपर वर्क्स एअरोडायनॅमिक किट, रिअर रूफ स्पॉयलर आणि आकर्षक १८ इंची जेसीडब्ल्यू थ्रील स्पोक अॅलाय व्हील्स आहेत. जॉन कूपर वर्क्सचा प्रभाव इल्युमिनिटेड कॉकपीटमध्ये जेसीडब्ल्यू स्पोर्ट्स लेदर स्टिअरिंग व्हीलमध्येही जाणवतो. या गाडीत विविध प्रिमिअम फिचर्स आहेत, जसे की लेदर क्रॉसपंच स्पोर्ट सीट्स, हार्मन कार्डन हाय-फाय स्पीकर सिस्टम, मिनी फाइंड मेट आणि मिनी वायर्ड पॅकेज. मिनी वायर्ड पॅकेजमध्ये नेव्हिगेशन सिस्टम प्रोफेशनल आणि टच कंट्रोलरसह मिनी कनेक्टेड एक्सएल ८.८ इंच स्क्रीन आणि ब्ल्यूटूथ मोबाइल कनेक्टिव्हिटी आहे.

ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन आयलँड ब्ल्यू, लाइट व्हाईट, चिली रेड, मेल्टिंग सिल्व्हर आणि एक्स्ल्युसिवली मिनी कंट्रीमॅन कूपरएस जेसीडब्ल्यू इन्स्पायर्डसाठी थंडर ग्रे प्लस ब्रिटिश रेसिंग ग्रीन या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. मिनी कंट्रीमॅनमध्ये स्टँडर्ड अपहोल्स्ट्री म्हणून लेदर्रेट कार्बन ब्लॅक रंगात आणि ऑल-न्यू मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्ल्यू इन्स्पायर्डसाठी लेदर क्रॉस पंच कार्बन ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. तीन व्हेरिएंट्सच्या एक्स–शोरूम किंमत (जून २०१८ पासून लागू) याप्रमाणे आहेत मिनी कंट्रीमॅन कूपर एस (पेट्रोल)- आयएनआर ३४ लाख ९० हजार, मिनी कंट्रीमॅन कूपर एसडी (डिझेल)- आयएनआर ३७ लाख ४० हजार मिनी कंट्रीमॅन कूपर एस जेसीडब्ल्यू इन्स्पायर्ड (पेट्रोल)-  आयएनआर ४१ लाख ४० हजार.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search