Next
‘मसाप’च्या चिपळूण शाखाध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे
BOI
Monday, February 25, 2019 | 03:15 PM
15 0 0
Share this story

प्रा. संतोष गोनबरेचिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) चिपळूण शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. या वेळी अध्यक्ष म्हणून प्रा. संतोष गोनबरे, तर कार्याध्यक्ष म्हणून अंजली बर्वे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही बैठक ‘मसाप’चे कोकण विभाग प्रतिनिधी आणि इतिहास-साहित्य-संस्कृतीचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.  

शहरातील जुना भैरी मंदिरानजीकच्या रेखा देशपांडे यांच्या अद्वैत या सभागृहात नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ही कार्यकारीणी निवडताना विद्यमान जेष्ठ सदस्यांनी तरुण साहित्यप्रेमी पिढीवर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी कार्यकाळात साहित्य चळवळ अधिक व्यापक करीत समाजातील प्रत्येक घटक साहित्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नव्या कार्यकारणीवर असणार आहे.

नवनियुक्त कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष- कवी राष्ट्रपाल सावंत, कार्यवाह- कवी चंद्रकांत राठोड, कोषाध्यक्ष- प्रकाश घायाळकर, विद्यालयीन कार्यक्रमप्रमुख- शिवाजी शिंदे, महाविद्यालयीन कार्यक्रमप्रमुख- सोनाली खर्चे, प्रसिद्धीप्रमुख- धीरज वाटेकर, सदस्य- महम्मद झारे, रवींद्र गुरव, कैसर देसाई, समीर कोवळे, प्राची जोशी. मराठी साहित्य परिषदेच्या देश-विदेशात शाखा आहेत.

डिसेंबर महिन्यात भूवनेश्वर-ओरिसा येथे झालेल्या २६ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून आंबडस हायस्कूलची आरती मोरे हिची निवड झाली होती. तिने प्रा. गोनबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रीन ग्रास फ्रॉम अ‍ॅग्रिकल्चरल वेस्ट’ हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही कौतुक केले होते. प्रा. गोनबरे हे आपल्या मूळ रानपाट गावीही साहित्य उपक्रम, डिजिटल क्‍लासरूम आणि वाचनालय चळवळ राबविण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांचे आणि नव्या कार्यकारिणीचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link