Next
‘बजाज अलियांझ’तर्फे निवृत्तीनंतर उत्पन्न देणारी योजना सादर
प्रेस रिलीज
Monday, April 08, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : निवृत्तीनंतर दैनंदिन खर्च, आरोग्यासंदर्भातील समस्या, कौटुंबिक गरजा आणि पुरेशी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आवश्यक तेवढे उत्पन्न देणारी एक योजना बजाज अलियांझने दाखल केली आहे.  

गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्थेतील विकास पातळी उंचावल्यामुळे भारतातील महागाई वेगाने वाढली आहे. जगण्याचा आणि आरोग्यसेवांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर दैनंदिन खर्च, आरोग्यासंदर्भातील समस्या, कौटुंबिक गरजा आणि पुरेशी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आर्थिक निधीची आवश्यकता भासते. म्हणूनच महागाईच्या दराला तोंड देऊ शकेल आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यात उत्पन्न स्त्रोताची खात्री देईल असा निधी उभारण्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. आज अशा प्रकारचा निधी उभारण्यासाठी विविध प्रकारची आर्थिक साधने अस्तित्वात आहेत, मात्र त्यांचे काही तोटेही आहेत. काही साधने खात्रीशीर परताव्यांची हमी देतात, मात्र अशी उत्पादने महागाईचा विचार करत नाहीत.

ही दरी सांधण्यासाठी बजाज अलियांझ जीवन विमा कंपनीने नुकतीच नव्या युगातील सर्वसमावेशक युनिट लिंक्ड विमा योजना ‘बजाज अलायन्झ लाइफ लाँगलाइफ गोल’ सादर केली आहे. ही संपूर्ण आयुष्यासाठीची युलिप योजना असून, त्यात करमुक्त निवृत्ती पश्चात उत्पन्न, ९९ वर्षांपर्यंत जीवन विमा कवच आणि संकटकालीन परिस्थितीमध्ये अंशतः पैसे काढण्याची लवचिकता अशा आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

‘बजाज अलियांझ लाँगलाइफ गोल’ ही योजना प्रीमियमसह किंवा प्रीमियमशिवाय या दोन प्रकारांमध्ये येते. या फंडामध्ये जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार इन्व्हेस्टर सिलेक्टेबल पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी, व्हील ऑफ लाइफ पोर्टफोलिओ, स्ट्रॅटेजी टू, ट्रिगर बेस्ड पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी आणि ऑटो ट्रान्सफर पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी ही चार वेगवेगळी गुंतवणूक धोरणे समाविष्ट करण्यात आली आहेत. निवृत्तीपश्चात करमुक्त उत्पन्न, संपूर्ण आयुष्यासाठी कवच, जीवितहानी शुल्कावर नियमितपणे परतावे, रिटर्न एनहान्सर ही योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search