Next
‘मोबिक्विक’ आणि ‘ओएनएन बाइक्स’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Wednesday, September 12, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : मोबिक्विक या भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचाने लोकांचा दैनंदिन प्रवास सुखकर बनवणाऱ्या ‘ओएनएन बाइक्स’ या बाइक रेंटल प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करत ट्रॅव्हल क्षेत्रातील प्रवेशाची घोषणा केली आहे.

मोबिक्विक यूजर मोबिक्विक अ‍ॅपद्वारे बाइक, स्कूटर किंवा स्कूटी भाड्याने घेऊ शकतात. शहरांतर्गत प्रवास त्रासमुक्त, परवडणारा आणि सोयीचा बनवणे हा या भागीदारीमागचा उद्देश आहे. सध्या ही सेवा बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, कोटा, मैसूर आणि उदयपूर या सहा प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार असून, पुढील काळात आणखी काही शहरांमध्ये या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.

वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण पातळीत होणारी वाढ, जागेची मर्यादा या विविध कारणांमुळे भारतातील टियर एक, दोन आणि तीन नगरे आणि शहरांत दुचाकी हा प्राधान्य दिला जाणारा पर्याय आहे. आजच्या काळात स्वत:ची वाहने खरेदी करण्यापेक्षा भाडे तत्त्वावर वाहने घेण्यास पसंती देण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रारंभिक ऑफर म्हणून, मोबिक्विक यूजर सुपरकॅश मूल्याच्या पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळवण्यासाठी सुपरकॅशचा वापर करू शकतात.

या नवीन क्षेत्रातील प्रवेशाविषयी बोलताना ‘मोबिक्विक’चे  वरिष्ठ संचालक आणि व्यवसाय प्रमुख बिक्रम बिर सिंह, म्हणाले, ‘आमच्या अंतर्गत संशोधनानुसार टियर एक/दोन आणि तीन शहरांत महिला आणि तरुणांसह सर्वच युजरची रेंटल क्षेत्रात दुचाकीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आम्ही अधिकाधिक कृती आणि जेथे दुचाकी रेंटल एक आशादायी श्रेणी ठरू शकते अशा टियर-एक नगरे आणि शहरांपलीकडे असलेल्या असंख्य भारतीयांसाठी आर्थिक समावेशनाचा समतोल साधण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही ओएनएन बाईक्सच्या सहयोगाने ही श्रेणी सुरू करीत आहोत आणि भविष्यात या श्रेणीमध्ये प्रभावी वाढ दिसून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.’

‘ओएनएन बाइक्स’चे मुख्य विपणन अधिकारी आणि सह-संस्थापक, आकाशदीप सिंघल म्हणाले, ‘मोबिक्विकसोबत आमच्या भागीदारीबद्दल आम्ही फार उत्सुक आहोत. हे भारताचे दुसरे सर्वांत मोठे मोबाईल वॉलेट आहे आणि ही भागीदारी शहरांमधील लाखो नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल; तसेच ही भागीदारी प्रवास करणार्‍यांना बाइक भाड्याने घेण्याची आणि मोबिक्विक ॲपद्वारे पेमेंट करण्याची सोय प्रदान करेल. आम्हाला भारतातील प्रमुख १० शहरांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आमच्या तीन हजार ५०० हून अधिक बाइक्सच्या मजबूत ताफ्याचा अभिमान वाटतो. मोबाईल वॉलेट क्षेत्रामध्ये ‘पसंतीचा भागीदार’ म्हणून मोबिक्विकसोबत, आम्ही अधिकाधिक युजरपर्यंत पोहोचणे आणि भारतीयांसाठी त्यांच्या पहिल्या आणि अंतिम स्थानाच्या कनेक्टिव्हिटी समस्येबद्दल संबोधण्याची आशा करीत आहोत.’

भारत सरकारने वर्तमान आर्थिक वर्षात ३० अब्ज व्यवहारांचे भव्य लक्ष साधण्याचा मानस बाळगला आहे ज्यात मोबाइल वॉलेट कंपनीद्वारे ६.३ अब्ज व्यवहारांच्या अपेक्षांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या भागीदारीमुळे देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. अमेरिका आणि चीन या देशांपाठोपाठ ग्राहकांना डॉक-लेस सेवांचा लाभ देऊन विलक्षण अनुभव प्राप्त करण्यावर आपला भारत देश भर देत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search