Next
#सातचा_चहा होतोय फेमस
BOI
Friday, August 31, 2018 | 03:09 PM
15 0 0
Share this article:



नाशिक :
आजचे जग सोशल मीडियाचे आहे. एका बाजूला माणसा-माणसांतील संबंध दुरावत चालले आहेत आणि दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र माणसे प्रचंड क्रियाशील असलेली दिसतात. या विरोधाभासाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्यक्षात माणसांच्या गाठीभेटी व्हाव्यात, त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टींवर गप्पागोष्टी, चर्चा व्हाव्यात, म्हणून नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी #सातचा_चहा हा उपक्रम सुरू केला आहे. रोज सकाळी सात वाजता नाशिक-पुणे रोडवरील भावे प्लास्टो येथील सामाजिक कट्ट्यावर सामान्यातील असामान्य व्यक्तींना बोलावले जाते. आणि त्यांच्याशी सुरू असलेल्या गप्पांचे ‘फेसबुक लाइव्ह’ केले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष समाजात आणि सोशल मीडियावरही #सातचा_चहा हा ट्रेंड फेमस होऊ लागला आहे.



सोशल मीडियामुळे आज प्रत्यक्ष भेटींवर फारसा भर दिला जात नाही. माणसाला एकमेकांना भेटायला, विचारांचे आदानप्रदान करायला वेळ नाही. म्हणूनच समाजातील सामान्य असून असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींना सातच्या चहाला बोलावले जाते. नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांची ही संकल्पना हळूहळू नाशिक जिल्ह्यात रुजू लागली आहे. विवेक आणि नीतिमत्ता जपून समाजात कामे करणाऱ्या माणसांना आम्ही सातच्या चहाला बोलावतो, असे भावे यांनी सांगितले.



सातच्या चहाला रोज एका व्यक्तीला बोलावले जाते. ती व्यक्ती स्वतः कामगिरी केलेल्या किंवा आपल्या अभ्यासाच्या विषयावर स्वतः माहिती सांगते किवा जितेंद्र भावे आणि त्यांचे मित्र प्रश्न विचारतात. त्यातून या गप्पा खुलत जातात. या गप्पा ‘फेसबुक’वर लाइव्ह दाखवल्या जात असल्याने या चर्चेत जगातील अनेक भारतीय नागरिक सहभाग नोंदवतात. कोणी प्रश्न विचारतात, तर कोणी आपली प्रतिक्रियाही नोंदवतात. या सातच्या चहाला आजपर्यंत, समाजात चांगल्या काम करणाऱ्या महिला, पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, डॉक्टर, कचरावेचक महिला, सामाजिक आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, उत्तम कामगिरी करणारे शिक्षक, वारकरी, रस्त्यावरील लोकांना आसरा देणाऱ्या व्यक्ती, वाचनालयासाठी काम करणारी मुले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, तृतीयपंथीय अशा समाजाच्या विविध क्षेत्रांतील नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. 

प्रकाश प्रजापती, जयेश गोतिसे, विनोद कळमकर, अभिजित शेट्टी, सूरज विश्वकर्मा, प्रशांत घाडगे, राकेश गोंधळे ही मंडळी त्यांचे आदरातिथ्य करतात. एकंदरीत ही वेगळी संकल्पना रुजू लागली आहे.

संपर्क : ९२२५७ ९२२५५

(येथे क्लिक केल्यास आपल्याला फेसबुकवरील #सातचा_चहा हा ट्रेंड पाहता येईल.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search