Next
भरतनाट्यमद्वारे पाणीबचतीचा संदेश
अनिता नेवे यांच्या नृत्यपूजा अॅकॅडमीचा उपक्रम
BOI
Saturday, March 16, 2019 | 02:22 PM
15 0 0
Share this story


पुणे : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरतनाट्यमद्वारे पाणीबचतीचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम अनिता नेवे यांच्या नृत्यपूजा अॅकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. ‘जल होश’ नावाचा हा उपक्रम पुण्यातील प्रमुख रस्ते, चौक आणि प्रमुख ठिकाणी राबवण्यात येत आहे. १६ आणि १७ मार्च असे दोन दिवस हा उपक्रम चालणार असून, शनिवारी (१६ मार्च) सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहिला कार्यक्रम करण्यात आला. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कलाकारांची भेट घेऊन उपक्रमाचे स्वागत केले. 


जंगलीमहाराज रस्ता, फर्गसन रस्ता, कोथरूड, शनिवारवाडा येथेही सादरीकरण करण्यात आले. रविवारी, १७ मार्च २०१९ रोजी सकाळी कल्याणीनगर, खराडी, विमाननगर या ठिकाणी हे जनजागृतीपर भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे. 


‘होळी, धुळवडीचा सण २० मार्च रोजी असल्याने त्यापूर्वी पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले,’ असे अनिता नेवे यांनी सांगितले.

(अनिता नेवे यांच्या नृत्यपूजा अॅकॅडमीतर्फे भरतनाट्यमद्वारे पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहे. त्याची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link