Next
जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दाभोळकर यांची निवड
ऑक्टोबर महिन्यात युरोपमध्ये होणार स्पर्धा
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 01:31 PM
15 0 0
Share this article:

संजय दाभोळकरठाणे : वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धा लिलया जिंकणारे संजय दाभोळकर यांची युरोप येथे होणार्‍या जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २० ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत युरोपमधील जी स्लोवोकिया शहरात बेंचप्रेस डेडलिफ्ट पॉवरलिफ्टिरंग स्पर्धा होणार आहे. यात दाभोळकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

बदलापूरचे रहिवासी आणि ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील सुपरमॅक्स कंपनीत सेवेत असलेल्या दाभोळकर यांनी कंपनीत एका शिफ्टमध्ये काम करून पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. ८२.५ ते ९० किलो वजनी गटात त्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्यावर्षी जानेवारी २०१८मध्ये दाभोळकर यांनी कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात १२५ किलोचे बेंचप्रेस उचलून देशात अव्वल क्रमांक मिळवला. 

हरियाणामधील सोनिपत येथे युरोपमध्ये जाणार्‍या खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये नॅचरल स्ट्राँग पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या अंतर्गत २६ मे २०१९ रोजी निवड चाचणी झाली. यात दाभोळकर यांनी वयाच्या ५३व्या वर्षातही तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली. त्यांची ८२.२ किलो वजनी गटात निवड झाली आहे. 


या पूर्वी नाशिक येथे झालेल्या ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्ट्र टायटल’ हा किताब पटकवला होता. एप्रिल २०१७मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्टलीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे; तसेच वीर हनुमान क्रीडा सांस्कृतिक युवा जन संघातर्फे कर्नाटक राज्यातील हॉस्पेट (जिल्हा बेल्लारी) येथे झालेल्या स्पर्धेतील सबज्युनिअर, ज्युनिअर, वरिष्ठ आणि मास्टर स्त्री आणि पुरुष अशा वेगवेगळ्या गटांमध्ये १८ संघ आणि ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. दाभोळकर यांनी ८२.५ किलो वजनी गटात मास्टर-टूमध्ये ५० वर्षांवरील स्पर्धेत देशभरातून प्रथम क्रमांक मिळवला; तसेच मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली व गुजरात आदी राज्यांतील विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत दाभोळकर यांनी अव्वल कामगिरी केली आहे. 

ठाण्यातील ‘सुपरमॅक्स पर्सनल केअर’ कंपनीत ते कार्यरत असून, स्पर्धेसाठी त्यांना महाराष्ट्र राष्ट्रीय कामगार संघटनेचे (इंटक) अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंद मोहिते आणि कंपनीतील प्लांन्ट व्यवस्थापक उदय देसाई व श्री. शेख आदींचे विशेष सहकार्य लाभल्याचे दाभोळकर यांनी सांगितले.

दरम्यान, दाभोळकर यांनी एबी फिटनेसच्या माध्यमातून बदलापूर-उल्हासनगर येथे रतन हेल्थ क्लबमध्ये पॉवर लिफ्टिंगचे क्लासेस सुरू केले आहेत. या क्लासमधील सात विद्यार्थ्यांचीही निवड भारतीय संघातर्फे झाली आहे. यामध्ये अजय पवार, कुंदनकुमार मोरे, योगेश मखिजा, दीपक दीक्षित, लीना दीक्षित, अमित मोटवानी, वर्षा रामटेके आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search