Next
‘रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती करणार’
BOI
Saturday, April 28 | 11:57 AM
15 0 0
Share this story



सोलापूर :
‘वाहन नोंदणीवर आकारल्या जाणाऱ्या अर्धा टक्के अधिभारातून जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेबाबत उपाययोजना आणि त्याबाबत जाणीव जागृती केली जाणार आहे’, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.


जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासकीय विश्रामगृहातील सभागृहात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, समिती सदस्य राजा माने, दिलीप कोल्हे, सांरग तारे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीबाबत माहिती देताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे म्हणाले की, ‘नव्या वाहनांच्या नोंदणीवर अर्धा टक्के कर आकारला जात आहे. या करापोटीचे सोलापूर जिल्ह्यासाठीचा निधी लवकरच जिल्ह्याला परिवहन आयुक्त कार्यालयातून मिळणार आहे. या निधीतून रस्ता सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर जाणीव जागृती करण्यासाठीही या निधीतून खर्च केला जाणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link