Next
‘डीकेटीई’चे प्रा. वाय. एम. इंडी यांना पीएचडी
प्रेस रिलीज
Thursday, August 16 | 04:54 PM
15 0 0
Share this story

प्रा. वाय. एम. इंडी
 इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या ‘टेक्स्टाईल अँड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट’मध्ये गेली २३ वर्षे कार्यरत असणारे  प्रा. वाय. एम. इंडी यांना शिवाजी विद्यापीठाची टेक्स्टाईल इंजिनिअरींगमधील पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. यासाठी त्यांना ‘डीकेटीई’चे अनुभवी प्राध्यापक डॉ.ए. आय. वासिफ यांचे मार्गदर्शन मिळाले. 
  
प्रा. डॉ. वाय. एम. इंडी यांनी ‘ग्रीन टेक्नॉलॉजी इन केमिकल प्रोसेसिंग ऑफ टेक्स्टाईल्स’ या विषयावर पीएचडीसाठीचा संशोधन प्रबंध पूर्ण केला आहे. याअंतर्गत त्यांनी पर्यावरणस्नेही नवीन ब्लिचिंग पध्दतीवर संशोधन केले आहे. त्यांनी विकसित केलेल्या नवीन ब्लिचिंग पध्दतीचा वापर करून बनविलेल्या कापडाची गुणवत्ता ही पारंपारिक ब्लिचिंग पध्दतीने तयार केलेल्या कापडापेक्षा अधिक दर्जेदार असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रा. इंडी यांच्या नवीन ब्लिचिंग पध्दतीमुळे या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि उर्जा दोन्हीची बचत होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रबंधावर त्यांनी इंटरनॅशनल जर्नल्समध्ये तीन संशोधन पेपर प्रसिध्द केले आहेत. प्रा. इंडी यांनी  बी. टेक व एम. टेक.च्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

प्रा. इंडी यांना पीएचडी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांनी अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link