Next
रोपळे गावात रामजन्मोत्सव साजरा
BOI
Tuesday, March 27 | 05:07 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे बुद्रुक येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जन्मोत्सव या काळात भजन, कीर्तन, प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायण असे नित्य कार्यक्रम होत आहेत. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बबन महाराज खपाले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली. या वेळी भाविकांना रामफळ व डिंकवड्याचा प्रसाद वाटण्यात आला. त्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात पिकलेली रामफळे जमा केली होती. 

रामफळांचा प्रसादत्यानंतर मंदिरातच महिला भाविकांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गाऊन प्रभू श्रीरामाचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम केला. त्यासाठी गावातील मारुती मंदिरात असलेल्या श्रीरामाच्या छोटेखानी मंदिरासमोर पाळणा बांधला होता. श्रींच्या नामकरण विधीनंतर विष्णू साळुंखे यांनी त्यांच्या घरी महाप्रसादाचे वाटप केले. या सोहळ्याला रोपळे व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

(या उत्सवाची छोटीशी झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link