Next
२७ मार्चपासून कणकवलीत सत्ताविसावा नाट्योत्सव
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजन; सात उत्तमोत्तम कलाकृती पाहता येणार
BOI
Wednesday, March 27, 2019 | 11:43 AM
15 0 0
Share this article:

कणकवली :  २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन. त्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने कणकवली नाट्योत्सवाचे आयोजन केले आहे. हा सत्ताविसावा नाट्योत्सव असून, २७ मार्च ते एक एप्रिल २०१९ या कालावधीत तो होणार आहे. समांतर रंगभूमीवरील स्त्री जाणिवांचे आणि अन्य विविधांगी नाट्यानुभव देणाऱ्या उत्तमोत्तम सात कलाकृती या नाट्योत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, रंगकर्मी वामन पंडित यांनी दिली. 

उत्सवाच्या कालावधीत दररोज रात्री साडेनऊ वाजता कणकवलीतील आचरेकर प्रतिष्ठान नाट्यमंदिरात हे नाट्यप्रयोग होणार आहेत. 
...........
२७ मार्च २०१९
‘भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबई’ निर्मित 

संगीत देवबाभळी 

लेखक, दिग्दर्शक : प्राजक्त देशमुख 
कलाकार : शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी

(या नाटकाच्या अनुषंगाने दोन्ही कलाकारांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
......
२८ मार्च २०१९. रात्री साडेनऊ वाजता
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित, पु. ल. देशपांडे अनुवादित


एकपात्री रंगावृत्ती : अनिल दांडेकर
दिग्दर्शक : वामन पंडित 
कलाकार : श्याम नाडकर्णी
........
२८ मार्च २०१९. रात्री ११ वाजता
‘बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ’ निर्मित,
पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या सहजीवनावर आधारित एकपात्री दीर्घांक 


लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका : वर्षा वैद्य
..........
२९ मार्च २०१९
‘निशाद, पणजी-गोवा’ निर्मित,
आद्य स्त्री नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर आधारित नाट्य

पालशेतची विहीर

लेखक, दिग्दर्शक : विजयकुमार नाईक
कलाकार : सिद्धी उपाध्ये, मनुजा नार्वेकर, गायत्री पाटील, गीता जोशी, योगेश जोशी, दीपक आमोणकर, मन्वेश नाईक, सतीश नार्वेकर, प्रसाद कळंगुटकर, मिलिंद माटे
........
३० मार्च २०१९ 
‘नाटकघर, पुणे’ आणि ‘जॉय गट, सोलापूर’ निर्मित

किमया – अपरिचित आसमंताचा वेध

लेखक : माधव आचवल
संकल्पना : अतुल पेठे, अमोल चाफळकर
वाचन : अतुल पेठे

(‘किमया’ या प्रयोगाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
........
३१ मार्च २०१९ 
‘मिती – चार, कल्याण’ आणि ‘अस्तित्व, मुंबई’ निर्मित आणि डॉ. संतोष पोटे प्रस्तुत,
पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ या कादंबरीवर आधारित एकपात्री दीर्घांक 


रंगावृत्ती दिग्दर्शन, नेपथ्य : रवींद्र लाखे
कलाकार : प्रिया जामकर
..........
एक एप्रिल २०१९
‘साई कला मंच, कुडाळ’ प्रस्तुत दोन अंकी नाटक

घोकंपट्टी डॉट कॉम

(राज्य नाट्य स्पर्धेच्या कोकण विभागात प्रथम क्रमांक विजेते नाटक)
लेखन, दिग्दर्शन : केदार देसाई
कलाकार : सुलेखा डुबळे, ईशान देसाई, केदार देसाई, श्वेता कुडाळकर, दिलीप घाटकर, रुचिता शिर्के, भावना प्रभू, भूषण बाक्रे, स्मिता नाबर, प्रणय गावडे, अनिल पाटकर, भूषण तेजम, आदित्य कुडाळकर

पूर्णोत्सव सदस्यत्वासाठी केवळ ५०० रुपये शुल्क असून, परिवार सदस्य होण्यासाठी एक हजार रुपये, तर संस्थेचे आजीवन सभासद होण्यासाठी १० हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. 

नोंदणीसाठी संपर्क : राजेश राजाध्यक्ष - ९४२१६ ४४०८०

(वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ‘रंगवाचा’ या रंगभूमीविषयक त्रैमासिकातील काही लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search