Next
आयसीआयसीआय बँकेतर्फे एनपीएससाठी डिजिटल नावनोंदणी
प्रेस रिलीज
Thursday, December 21, 2017 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयसीआयसीआय बँकेमध्ये आता नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) साठीची नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन करता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या इंटरनेट बँकिंग खात्याच्या साहाय्याने एनपीएससाठी अत्यंत सोप्या पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.  यामुळे त्यांना बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागणार नाही किंवा कुठलीही प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.

याबाबत बोलताना  पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे कार्यकारी संचालक  ए.जी. दास म्हणाले, ‘नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस)साठी नोंदणी करण्यासाठी अधिक सुलभ आणि सोपे मार्ग पुरवण्यासाठी पीएफआरडीए वचनबद्ध आहे. आयसीआयसीआय बँकेने एनपीएस खात्यांसाठी पूर्णपणे डिजिटल आणि कागदपत्रांरहित सुविधा उपलब्ध करून दिल्याचा, आम्हाला अतिशय आनंद आहे. या नव्या सुविधेमुळे आपल्या देशातील नागरिकांना ही योजना सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे, यासाठी त्यांना बँकेच्या कुठल्याही शाखेला भेट द्यावी लागणार नाही. तसेच यामुळे प्रशासनाच्या डिजिटल इंडिया मिशनचे सबलीकरण होण्यासही मदत होणार आहे.’

आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेचे ‘रेडी फ़ॉर यू. रेडी फॉर टुमॉरो’ हे तत्त्वज्ञान आहे. आमच्या ग्राहकांना नेहमीच नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, यामुळे सर्वोत्तम सुलभता ग्राहकांना देता येते. आमच्या तत्त्वज्ञानाच्या धर्तीवर,आम्हाला `पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' (पीएफआरडीए) आणि ‘एनएसडीएल इ-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’बरोबर कार्य करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  ही सेवा सर्व दिवस अखंड उपलब्ध असेल, एनपीएससाठी आपल्या इंटरनेट बँक खात्यातून ग्राहक लॉगइन करू शकतात’.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search