Next
‘पटवर्धन’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
BOI
Friday, January 25, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या १९७६ ते १९९०पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा माजी विद्यार्थी संघामार्फत नुकताच आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी शहर, जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या अनेक लांबच्या शहरांत असलेले माजी विद्यार्थीही या मेळाव्यात उत्साहाने सहभागी झाले होते. अशाच प्रकारचे मेळावे दर वर्षी माजी विद्यार्थी संघाने घेण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

हा मेळावा कै. भागोजीशेठ कीर सभागृहात झाला. यापूर्वी १० डिसेंबर २०१७ रोजी सन १९७५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा पहिला स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी सुनील उर्फ दादा वणजू, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह डॉ. चंद्रशेखर केळकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, मुख्याध्यापक विजय वाघमारे, शुभांगी जोशी, मरीनर दिलीप भाटकर, कार्यवाह वसंत भणसारी, खजिनदार संतोष कुष्टे, भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विनायक हातखंबकर आदी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. ‘आता विश्‍वात्मके देवे’ या प्रार्थनेने मेळाव्याची सुरुवात झाली. त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली.

संघाचे अध्यक्ष डॉ. नागवेकर यांनी संघाची स्थापना, त्याची ध्येय-धोरणे आणि या संघामार्फत गेल्या दोन वर्षांत आजी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम, तसेच पुढे राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती दिली. त्यानंतर संघाचे सचिव भणसारी यांनी राष्ट्रपती पारितोषिकाने गौरविण्यात आलेले गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन यांचे स्मारक शाळेच्या आवारात, तसेच त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी हॉल उभारण्यासंबंधी सविस्तर माहिती दिली. सर्व माजी विद्यार्थींनी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य होऊन आपल्या शाळेसाठी जास्तीत जास्त मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शैक्षणिक, कृषी, आरोग्य व क्रीडा, तसेच समाज उपयोगी वेगवेगळी शिबिरे आजी व माजी विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

त्यानंतर भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, डॉ. केळकर, मुख्याध्यापक विजय वाघमारे यांनी संस्थेच्या शाळेच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link