Next
‘वेस्टसाइड’तर्फे पहिलावहिला सेल
प्रेस रिलीज
Saturday, June 30 | 11:44 AM
15 0 0
Share this story

पुणे : टाटा समूहातील फॅशन स्टोअर ‘वेस्टसाइड’ आपला पहिलावहिला एंड ऑफ सीझन सेल सुरू करत आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील स्टोअरमध्ये हा सेल सुरू होणार आहे. या सेलदरम्यान कपडे, पादत्राणे, अॅक्सेसरीज आणि सौंदर्यप्रसाधनांवर ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.

‘वेस्टसाइड’ने स्त्रियांसाठी समकालीन आणि एक्स्लुसिव्ह डिझाइन्सच्या कपड्यांची विस्तृत श्रेणी आणली आहे. तरुणांसाठी उत्कंठावर्धक कपड्यांचा न्युऑन ब्रॅंड, बांधेसूद स्त्रियांसाठी सॅसी सोडा किंवा जीआ अशी विविधता यामध्ये आहे.

फॅशनच्या अगदी अलीकडील ट्रेंड्सचा विचार करून ‘वेस्टसाइड’ने पुरुषांसाठी कपड्यांची विस्तृत श्रेणी आणली आहे. यामध्ये तरुणाईसाठी न्युऑन ब्रॅंड आहे, तर पारंपरिक प्रभाव असलेल्या तसेच निसर्गापासून प्रेरणा घेणाऱ्या कपड्यांचा ईटीए ब्रॅंड आहे, शिवून घेतलेल्या कपड्यांची परिपूर्णता हवी असेल, तर अॅस्कॉट आहे, कॅज्युअल कपडे हवे असतील, तर वेस्टस्पोर्ट आहे. परफॉर्मन्स फॅब्रिकमधील फिटनेस वेअरसाठी स्टुडिओफिट आहे, तर समकालीन आणि आत्मविश्वास जागवणाऱ्या पोशांखासाठी डब्ल्यूईएस आहे.

लहान मुलांसाठी बेबी हॉप, हॉप आणि वाय अॅंड एफ या ब्रॅंड्समधील कपड्यांची वैविध्यता उपलब्ध आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link