Next
‘जीटीटीईएस २०१९’चे मुंबईत आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, December 20, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : येथे १८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान भरविल्या जाणाऱ्या ‘जीटीटीईएस २०१९’मध्ये वस्त्रोद्योगासाठी नेटवर्किंग व व्यवसायाच्या नवीन संधी खुल्या केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ब्रँड् यामध्ये सहभागी होणार आहेत.

सध्या अर्थव्यवस्था मंदावलेली असूनही ‘जीटीटीईएस’ने उपलब्ध केलेल्या व्यासपीठाचा उपयोग करून घेत व्यवसायाच्या नवीन संधी चोखाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शक आपल्या ब्रॅंड्स व उत्पादनांचे प्रदर्शन येथे करणार आहेत. भारतातील टेक्स्टाइल इंजिनीअरिंग कंपन्याही यात समाविष्ट होणार असून, प्रादेशिक औद्योगिक केंद्रांतील १६८ नवीन प्रदर्शक ‘जीटीटीईएस २०१९’मध्ये सहभागी होणार आहेत; तसेच आफ्रिका, उझबेकिस्तान, इजिप्त, आखाती देश, अमेरिका, इथिओपिया आदी देशांतील प्रतिनिधींशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंगसाठीचे हे प्रदर्शन इंडिया आयटीएमई सोसायटीने आयोजित, तसेच प्रस्तुत केले आहे. त्यांनी आयोजित केलेल्या इंडिया टाइम एक्झिबिशनला भारतातील आघाडीच्या बीटूबी प्रदर्शनांसाठी दिला जाणारा पुरस्कारप्राप्त झाला आहे. भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख कंपनी लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेड या दर्शनात सहभागी होऊन देशासह आंतरराष्ट्रीय ग्राहकांसमोर आपली उत्पादने मांडणार आहे. ही कंपनी आपल्या ब्रॅंड प्रतिमेचे प्रमोशन करून, तसेच ग्राहकांसोबतचे संबंध पुढील स्तरावर नेत सर्व संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.

‘जीटीटीईएस २०१९’ हा टेक्स्टाइल इंजिनीअरिंग उद्योगासाठी एक मोठे व्यवसाय व्यासपीठ आहे. ईएलजीआय, लुवा, सिम्टा, लक्ष्मीकार्ड क्लोदिंग मॅन्युफॅक्चुअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (एलसीसी), मीरा इंडस्ट्रीज, डीएन असोसिएट्स, अंजनेयट्युब्रेज आदी प्रतिष्ठित कंपन्या त्यांची सर्वोत्तम उत्पादने, कस्टमाइझ्ड सेवांचे प्रदर्शन यात करणार असून, आगामी वर्षातील बाजारपेठेतील प्रवाहांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी सज्ज होणार आहेत.

आफ्रिका आणि आग्नेय आशियातील वस्त्रोद्योग उद्योगातील उत्पादन व सेवांसाठी भारतात वाढत असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यवसाय, तसेच नवीन ग्राहकांना सर्वोत्तम सोर्सिंग सोल्युशन्स देणारे व्यावसायिक व्यासपीठ, तसेच वाढीमधील संप्रेरकाची भूमिका ‘जीटीटीईएस’ बजावत आहे.

भारत ही आज वस्त्रोद्योगातील यंत्रसामुग्रीसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि ‘जीटीटीईएस २०१९’ हा वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री उत्पादकांसाठी आतापर्यंत कधीच न बघितलेल्या बाजारपेठेतील संधींपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मोठ्या वस्त्रोद्योग कंपन्यांनी या पूर्वीच प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे आणि ‘जीटीटीईएस’मधील प्रदर्शकांशी संवाद साधून सर्वोत्तम व्यावसायिक करार करण्यासाठी, तसेच उपयुक्त चर्चांसाठी नियोजनही केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search