Next
मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना रोपळे गावात भोजन
BOI
Friday, July 12, 2019 | 11:43 AM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथे आलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना गावजेवणाची मेजवानी देण्यात आली. 



रोपळे या गावाने अन्नदान करण्यात आपले नाव कमावले आहे. सध्या आषाढी वारीचा काळ चालू आहे. त्यामुळे गावात वारकरी भाविकांची मांदियाळी जमली आहे. यामुळे गावात दररोज पंगती उठत आहेत. प्रत्येकाच्या घरी वारकरी मुक्कामाला असतात. दोन दिवसांपूर्वी गावात सकाळी संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत गावाच्या वतीने सरपंच दिनकर कदम यांनी केले. या वेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



पालखी सोहळा गावात विसावताच सोहळ्यातील वारकऱ्यांना एकाच पंगतीमध्ये भोजन देण्यात आले. वारकऱ्यांना गावजेवणाची मेजवानी देण्यासाठी ग्रामस्थांनी आपापल्या घरातून गरमागरम भाजी-भाकऱ्या एकत्र जमा केल्या होत्या. कोणी ज्वारीची भाकरी आणत होते, तर कोणी मक्याची भाकरी, कोणी गव्हाची पोळी (चपाती), तर कोणी बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा खर्डा (ठेचा). वर तोंडी लावायला आंब्याचे आणि लिंबाचे लोणचेही दिले जात होते. जमा झालेल्या सर्व भाज्या एकत्र केल्यामुळे या भाजीची चवच न्यारी होती. या वेळी सरपंच दिनकर कदम यांनी संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मेजवानी देण्याची परंपरा टिकवण्यात गावकऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search