Next
भालेकर, फुलकर यांचे चित्रप्रदर्शन
प्रेस रिलीज
Saturday, April 07, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this storyपुणे : सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या दीपाली व वसंत भालेकर यांनी चित्रकला छंद म्हणून जोपासली आहे. त्यांनी ग्रामीण जीवन, निसर्ग, मानवी भावना आदींवर चित्रे काढली आहेत; तसेच आर्टिस्ट राहुल फुलकर यांनी विविध देव-देवता यांची चित्रे साकारली आहेत. या तिघांच्याही रंगकुंचल्यातून चितारलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

मानवी भावना तसेच व्यक्तिचित्रण हे नेहमीच चित्रकारांना चितारण्यासाठी आकर्षित करीत असतात. आर्टिस्ट फुलकर यांनी विविध देव-देवता यांच्याबरोबर केलेले व्यक्तिचित्रण या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनात त्यांनी गणपतीची विविध रूपे, बाळकृष्णासाठी आकर्षक रंगसंगती वापरली आहे.

प्रदर्शनाविषयी :
कधीपर्यंत : आठ एप्रिल २०१८
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी आठ
स्थळ : पु. ना. गाडगीळ आणि सन्स, हॅपी कॉलनी, कोथरूड, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link