Next
‘पिरामल फाउंडेशन’चा एमरॉय युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार
मुख्याध्यापक, शिक्षक, सरकारी अधिकाऱ्यांच्या क्षमताविकास करण्यावर भर
प्रेस रिलीज
Saturday, June 22, 2019 | 12:24 PM
15 0 0
Share this article:


गुरुग्राम : पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप (पीएफईएल) या पिरामल फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमाने भारतातील सरकारी शाळांमध्ये सोशल इमोशनल एथिकल (एसईई) शैक्षणिक अभ्यासक्रम राबवण्याच्या हेतूने मुख्याध्यापक, शिक्षक व सरकारी अधिकारी यांच्या क्षमताविकास करण्यासाठी अमेरिकेतील एमरॉय युनिव्हर्सिटीशी परस्पर सामंजस्य करार केला आहे.  

‘पीएफईएल’ येत्या दोन वर्षांत गुजरात, झारखंड, जम्मू व काश्मीर, महाराष्ट्र व राजस्थान येथे पाच लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व पाच हजार सरकारी शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘एसईई’ शैक्षणिक अभ्यासक्रम चालवणार आहे. एमरॉय युनिव्हर्सिटीने ‘पीएफईएल’साठी १७ ते २० जून 2019 कालावधीत आयोजित केलेल्या चार दिवसांच्या कार्यशाळेत हा सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यशाळेत एमरॉय युनिव्हर्सिटी येत्या आठ महिन्यांत दीड हजारांहून अधिक ‘पीएफईएल’ कर्मचाऱ्यांमध्ये ७०हून अधिक लर्निंग सर्टिफाइड फॅसिलिटर प्रशिक्षित व विकसित करणार असून, हे कर्मचारी मुख्याध्यापक, शिक्षक व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन ‘एसईई’ शैक्षणिक अभ्यासक्रम राबवणार आहेत.

दलाई लामा यांचे कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह तेम्पा त्सेरिंग, एमरॉय युनिव्हर्सिटीतील सेंटर फॉर कॉन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्सचे कार्यकारी संचालक डॉ. लोबसांग तेन्झिन नेगी, पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नटराज व पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपचे सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक मोनल जयराम या वेळी उपस्थित होते.  

या विषयी बोलताना पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नटराज म्हणाले, ‘‘पीएफईएल’ने एमरॉय युनिव्हर्सिटीबरोबर केलेल्या भागीदारीमुळे दोन विशेष संस्था एकत्र येणार आहेत आणि या दोन्ही संस्थांमध्ये भारताती शिक्षण संस्थेमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. सोशल इमोशनल एथिकल शैक्षणिक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करून ‘पीएफईएल’चे दीड हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या क्षमतेद्वारे प्रात्यक्षिकापासून अॅडव्होकसीकडे जाण्याचे उद्दिष्ट आहे आणि २०२५पर्यंत पाच दशलक्ष बालकांना याचा लाभ द्यायचा आहे.’  


एमरॉय युनिव्हर्सिटीतील सेंटर फॉर कॉन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्सचे कार्यकारी संचालक डॉ. लोबसंग तेन्झिन नेगी म्हणाले, ‘एमरॉय युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर कॉन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अँड कम्पॅशन-बेस्ड एथिक्सने ‘एसईई लर्निंग’ तयार केला असून, व्यक्ती व एकंदर समाज यांना अतिशय आनंद देईल, अशी मूल्ये व क्षमता यांना उत्तेजन देण्यासाठी शिक्षणाचा विस्तार करता येऊ शकतो व केला जावा, असा विचार त्यामागे आहे. पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपने भारतात आघाडी घेतली आहे, ही आनंदाची बाब आहे आणि त्यामध्ये १४ राज्ये व १५ हजारांहून अधिक शाळांतील अस्तित्वाद्वारे शिक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची क्षमता आहे.’

अनुकंपेवर आणि विज्ञानावर आधारित असणाऱ्या ‘एसईई लर्निंग’ कार्यक्रमाचे वेगळेपण या कार्यक्रमाच्या व्याप्तीमध्ये व शास्त्रीय दृष्टिकोनामध्ये समावालेले असून, हा कार्यक्रम अर्ली एलिमेंटरी, लेट एलिमेंटरी व मिडल स्कूल यांसाठी विकास-योग्य अभ्यासक्रम उपलब्ध करतो. अभ्यासक्रमाच्या महत्त्वाच्या घटकांमध्ये एकाग्रता प्रशिक्षण, अनुकंपा व नैतिक व्यवहार कौशल्य, सिस्टिम्स थिंकिंग व लवचिकपणा आणि ट्रॉमा इन्फॉर्म्ड प्रॅक्टिस यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम इमोशनल इंटलिजन्स, न्यूरो सायन्स, डेव्हलपमेंट सायकॉलॉजी, शिक्षण व कॉन्टेम्प्लेटिव्ह सायन्स अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मदतीने केला आहे.

दलाई लामा ट्रस्ट, एमरॉय युनिव्हर्सिटी व वन फाउंडेशन यांनी नवी दिल्ली येथे चार ते सहा एप्रिल २०१९ रोजी जागतिक स्तरावर ‘एसईई लर्निंग’ दाखल केल्यावर थोड्याच वेळात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दलाई लामा, पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल व पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य नटराज या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search