Next
खटल्याच्या निकालाची प्रत मराठीतूनही उपलब्ध होणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत
BOI
Wednesday, July 10, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीसह अन्य सहा प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध होणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विधी क्षेत्रासह सर्वच स्तरांतून स्वागत करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वोच्च न्यायालयाच्या संकेस्थळावर जुलै महिन्याच्या अखेरपासून प्रादेशिक भाषांत निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीतूनच मिळत होते. अनेक वेळा पक्षकारांना आणि काही अंशी वकिलांनाही इंग्रजी निकाल समजण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ती अडचण आता दूर होणार आहे. 

इंग्रजीसह आता मराठी, हिंदी, तेलगू, आसामी, कन्नड आणि उडिया या सहा भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. हे निकाल अनुवादित करण्यासाठीचे सॉफ्टवेअर आणि इतर यंत्रणा न्यायालयाच्या ‘इलेक्ट्रिक सॉफ्टवेअर विंग’ने विकसित केली असून, सरन्यायाधीशांनीही याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नागरिक कायदेसाक्षर होऊ शकतात आणि त्यांची फसवणूक टळू शकते.

‘न्यायालयाच्या निर्णयाचे पक्षकारांकडून स्वागत होत आहे. इंग्रजीत असणारा न्यायालयीन निर्णय पक्षकारांना अनेकदा मराठीतून सांगावा लागतो. त्यामध्ये बराच वेळ खर्च होतो. मराठीतून न्यायालयीन निर्णय आल्यामुळे पक्षकार स्वतः वाचून अवलोकन करू शकतो,’ अशी प्रतिक्रिया अॅड. राणी रंधे-तळेकर यांनी व्यक्त केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search