Next
‘आर पिलेट्स’चा वर्धापनदिन उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, February 19 | 04:56 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आर पिलेट्स स्टुडिओ’चा तिसरा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक नामवंतांनी हजेरी लावल्याने सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने पुण्यातल्या पहिल्या पिलेट्स स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत ‘आर पिलेट्स कॅलेंडर’ लाँच करण्यात आले. या कॅलेंडरच्या विक्रीतून जमा होणारा निधी पुण्यातील निवारा वृद्धाश्रमला मदत म्हणून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री भार्गवी चिरमुले उपस्थित होत्या. फिटनेस प्रशिक्षक राधिका कारळे यांच्या हस्ते या फिटनेस कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.

पिलेट्स या विषयावर आधी कधी सादर केले नसलेले पिलेट्स कॅलेंडर या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आले, हा या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. जीवनाच्या विविध क्षेत्रांत आपला प्रभाव निर्माण केलेल्या आणि स्टुडिओच्या ग्राहक असलेल्या महिलांना स्टुडिओच्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून या कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे. सुजाता शिरोळे, पायल कलमाडी, सलोनी चाफळकर, नेहा चाफळकर, श्रुती शेट्टी, शीतल रांका, नीता गोयल, देवश्री मराठे, श्रिया कोलते-पाटील, स्नेहा बलदोटा आणि भावना कोठारी यांच्या उपस्थितीमुळे जणू अवघी स्री शक्तीच या कार्यक्रमाला एकवटली होती.

आर पिलेट्स स्टुडिओच्या मालक रूचा मुळे म्हणाल्या,  ‘निवारा वृद्धाश्रमाला मदत करण्यासाठीच केवळ आम्ही हे कॅलेंडर प्रकाशित केले आहे. पुण्यात आम्ही यशस्वीपणे तिसरा वर्धापनदिन साजरा करत असताना आमच्या मान्यवर ग्राहकांनी या वृद्धाश्रमाला काही प्रमाणात मदत करावी, अशी आमची इच्छा होती. कॅलेंडर प्रकाशनापूर्वीच्या विक्रीतून आम्ही १५ हजार रुपयांचा निधी उभा केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यात आम्ही भरघोस रकमेची भर घालून ती स्वयंसेवी संस्थेला मदत म्हणून देऊ.’

अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाल्या, ‘मला या कार्यक्रमात सहभागी होता आले याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. त्याचबरोबर ‘निवारा’ला आर्थिक मदत देण्यासाठी ‘आर पिलेट्स’ने घेतलेल्या पुढाकाराचेही मला कौतुक वाटते. या उत्तम कार्याला आपला पाठिंबा देण्यासाठी इतकी माणसे इथे एकत्र आली आहेत हे पाहून चांगले वाटले.’

सुजाता शिरोळे म्हणाल्या, ‘आर पिलेट्सने ‘निवारा’च्या सोबतीने हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी ‘आर पिलेट्स’चे अभिनंदन करते. समाजोपयोगी कार्यासाठीच्या या सोहळ्यात एकत्र आलेल्या मान्यवरांमध्ये मीही आहे याचा मला आनंद वाटतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link