Next
‘द्राक्षमहोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद’
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षाचे मुंबईत ब्रँडिंग व्हावे या उद्देशाने द्राक्षभूमी प्रतिष्ठान व सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून आयोजित केलेला द्राक्षमहोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असून, या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे,’ असे प्रतिपादन दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केले.

चेंबुर (पूर्व) येथे आयोजित द्राक्ष महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

खासदार शेवाळे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा माल द्राक्षउत्पादक मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने द्राक्षशेती करतो; परंतु योग्य दराअभावी आणि दलालांकडून होत असलेल्या पिळवणुकीमुळे तो अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल  थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी सांगली जिल्हा विकास संघ आणि द्राक्षभूमी प्रतिष्ठानने केलेला प्रयत्न हा निश्चितपणे कौतुकास्पद आहे.’  

या वेळी सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे, द्राक्षभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित झांबरे, मनिष औताडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शशिकांत माने, कांचन माने, पोपट खरात, लक्ष्मण जाधव, मनोहर रुपटक्के, आशा माने आदी मान्यवर, पदाधिकारी, तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link