Next
‘महिंद्रा’चा ‘फोर्ड’शी सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई/नवी दिल्ली : ‘महिंद्रा समूह’ आणि ‘फोर्ड मोटर कंपनी’ यांनी भारतात धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याचा निर्णय घेतला असून, या दोन्ही कंपन्या एक मध्यम आकाराचे नवे स्पोर्ट युटिलिटी वाहन संयुक्तरित्या विकसीत करणार आहेत. याबाबतचा करार दोन्ही कंपन्यांनी नुकताच केला.

या करारान्वये दोन्ही कंपन्या भारत व अन्य उदयोन्मुख देशांसाठी मापदंड ठरणारे एक विशेष वाहन विकसीत करणार आहेत. ‘महिंद्रा’ आणि ‘फोर्ड’ यांच्यात हे धोरणात्मक सहकार्य सप्टेंबर २०१७पासूनच सुरू झाले. ‘पॉवरट्रेन शेअरिंग’ची आणि ‘कनेक्टेड कार सोल्युशन्स’ काढण्याची घोषणा ऑक्टोबर २०१८मध्ये त्यांनी केली होती. हेच त्यांचे आपसातील सहकार्य नव्या कराराने अधिक बळकट झाले आहे. नवीन मिड-साइझ स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकलमध्ये (सी-एसयूव्ही) महिंद्राचे सध्याचे उत्पादन प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन असेल. त्याद्वारे वाहनाची अभियांत्रिकी आणि व्यावसायिक कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका म्हणाले, ‘आम्ही केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीमुळे आणि २०१७मध्ये ‘फोर्ड’बरोबरच्या आमच्या धोरणात्मक भागीदारीच्या घोषणेनंतर निर्माण झालेल्या सृजनशीलतेमुळे मला खूप आनंद झाला आहे. आजच्या घोषणेमध्ये आमच्या दोघांच्या सहकार्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोन्ही कंपन्या अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त विकासासाठी एकत्र आलेल्या असून, यापुढेही एकसमान प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्पादनांचा विकास करण्यासाठी एकत्र कार्य करत राहतील. यामुळे उत्पादन विकास खर्च कमी होईल आणि दोन्ही कंपन्यांचा आर्थिक फायदा होईल.’

‘फोर्ड’ कंपनीच्या नवीन व्यवसाय, तंत्रज्ञान व धोरण विभागाचे अध्यक्ष जिम फर्ली म्हणाले, ‘आजच्या नव्या कराराच्या घोषणेमुळे आम्ही ‘महिंद्रा’बरोबरची आमची चालू भागीदारी मजबूत करीत आहोत; तसेच भारतासारख्या महत्त्वपूर्ण उदयोन्मुख बाजारपेठेत आमची स्पर्धात्मकताही वाढवीत आहोत. ‘फोर्ड’चे तांत्रिक नेतृत्व आणि ‘महिंद्रा’चे कार्यान्वयाचे व उत्पादनाचे यशस्वी ठरणारे कौशल्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितपणे एक वाहन विकसित करण्यात येत आहे, जे भारतीय ग्राहक तसेच इतर उदयोन्मुख बाजारपेठांच्या अपेक्षा पूर्ण करेल.’

धोरणात्मक भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांची स्वतःची वैशिष्ट्ये अधोरेखीत होणार आहेत. ‘फोर्ड’चे जागतिक पातळीवरील अस्तित्व व कसब आणि ‘महिंद्रा’चा भारतातील मोठ्या व्याप व यशस्वी संचालनाचे मॉडेल या दोन्ही वैशिष्टयांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांनी विद्युतीकरण, वितरण व उत्पादन विकास अशा  परस्परसंबंधांच्या सर्व क्षेत्रांवर सहयोग करणे सुरू ठेवले आहे.

‘फोर्ड’च्या सध्याच्या व भविष्यातील वाहनांमध्ये वापरण्यासाठी ‘लो-डिसस्प्लेसमेंट’ पेट्रोल इंजिन विकसित करून पुरविण्यासाठी ‘फोर्ड’ने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस महिंद्रा समूहाशी करार केला आहे. हे उत्पादन २०२०मध्ये सुरू होईल. ‘महिंद्रा’ व ‘फोर्ड’ यांनी ‘टेलिमॅटिक्स कंट्रोल युनिट’चा संयुक्त विकास करण्याचीही घोषणा केलेली आहे.

‘महिंद्रा’ने मागील सात दशकांपासून भारतातील ‘युटिलिटी व्हेइकल’ क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे. जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या विद्युतीय वाहनांच्या पोर्टफोलिओसह स्वच्छ आणि परवडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अग्रगण्य असलेल्या काही जागतिक कंपन्यांमध्ये ‘महिंद्रा’चा समावेश झालेला आहे. आपल्या जागतिक उपस्थितीचा विस्तार करून ‘महिंद्रा’ने कोरियामधील सॅन्गाँग मोटर कंपनीतील बहुतांश हिस्सा विकत घेतला आहे; तसेच अमेरिकेतील ‘राइड-शेअरिंग’ क्षेत्रात गुंतवणूक करून ‘महिंद्रा’ने ‘शेअर्ड मोबिलिटी स्पेस’मध्ये प्रवेश केला आहे. ‘जेनझी’ ही जगातील पहिली इलेक्ट्रिक कनेक्ट स्कूटरही ‘महिंद्रा’ने विकसित केली आहे.

भारतात १९९५मध्ये प्रवेश करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी ‘फोर्ड’ ही एक आहे. सध्या ही कंपनी भारतातील सर्वाधिक कार निर्यात करणाऱ्यांपैकी एक बनली आहे. तामिळनाडूतील चेन्नई आणि गुजरातमधील साणंद येथे ‘फोर्ड’चे कारखाने आहेत. तेथे वाहने व इंजिने उत्पादीत व निर्यात करण्यात येतात. नवी दिल्ली, चेन्नई आणि कोयंबतूर या शहरांमध्ये ‘फोर्ड इंडिया’ आणि ‘फोर्ड ग्लोबल बिझिनेस सर्व्हिसेस ऑपरेशन्स’मध्ये १४ हजारांहून अधिक लोक काम करत असून, जागतिक स्तरावर ‘फोर्ड’च्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असणारा भारत हा दुसरा देश आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search