Next
जिम ट्रेलीज
BOI
Friday, March 23 | 03:45 AM
15 0 0
Share this story

मोठ्ठ्याने वाचन करून मुलांना साहित्याची गोडी निर्माण होते असं ठाम प्रतिपादन करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ लेखक जिम ट्रेलीजचा २३ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी ’ध्ये त्याचा अल्प परिचय...
....... 
२३ मार्च १९४१ रोजी न्यूजर्सीमध्ये जन्मलेला जिम ट्रेलीज हा शिक्षणतज्ज्ञ लेखक म्हणून ओळखला जातो.  

त्याने लहान मुलांच्या आकलनशक्तीसंदर्भात मोठ्याने उच्चार करून वाचण्यावर भर दिला आणि स्वतः या विषयावर लेखन केलं. त्याचं ‘द रीड-अलाउड हॅन्डबुक’ हे जगभर गाजलेलं पुस्तक ठरलं.
 
मोठ्ठ्याने वाचन करून मुलांना साहित्याची गोडी निर्माण होते असंही त्याचं म्हणणं. पेंग्विन प्रकाशनाने काढलेल्या त्याच्या 'द रीड-अलाउड हॅन्डबुक’च्या अमेरिकेबरोबरच ब्रिटीश, ऑस्ट्रेलिअन, स्पॅनिश, चायनीज, कोरिअन आणि जापनीज आवृत्त्या निघाल्या. त्याचा खप २० लाखांवर गेला आहे. 

त्याने वाचनावर कायमच भर दिला आणि ज्या घरात वर्तमानपत्र येतात आणि वाचली जातात अशा घरातल्या मुलांचं वाचन उत्तम असतं हे ठासून सांगितलं. त्याचं म्हणणं होतं ज्या घरांमध्ये आईवडील वाचताना दिसत नाहीत अशांच्या मुलांना ‘रोल मॉडेल’समोर न दिसल्याने अशी मुलंही वाचत नाहीत आणि वाचनानंदाला पारखी होतात.

‘हे, लिसन टू धिस’ आणि 'रीड ऑल अबाउट इट’ अशी त्याची पुस्तकंसुद्धा गाजली आहेत. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link