Next
वाढत्या ‘हायपर अ‍ॅसिडिटी’वर ‘डायजिन’ परिणामकारक
प्रेस रिलीज
Tuesday, April 23, 2019 | 01:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारी अ‍ॅसिडिटी ही लोकांमध्ये वाढती समस्या आहे. भारतातील ६१ टक्के शहरी लोकसंख्येला हायपर अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. यावर ‘एबॉट’चे ‘डायजिन’ हे आधुनिक काळातील दगदगीच्या जीवनशैलीसाठी वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेला उपाय आहे.

काही काळापूर्वी हायपरअ‍ॅसिडिटी हा आजार ग्राहकांचे वय किंवा शरीराचे आकारमान या घटकांशी निगडित होता; मात्र नव्या संशोधनानुसार, लोकांच्या जीवनशैलीमध्येच त्यांच्या हायपर अ‍ॅसिडिटीचे मूळ रुजले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शहरी जीवनातून येणार्‍या ताणामुळे आधीच्या तुलनेत अधिक प्रमाणात चुकीचे अन्नपदार्थ खाल्ले जात असल्याचे, शिवाय, खाण्याच्या सवयी अनियमित असून, ताणतणावांमध्येही वाढ होत असल्याचे संशोधनात सहभागी झालेल्यांनी सांगितले. आहे. आणखी एका संशोधनातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, अ‍ॅसिड रीफ्लक्सचे ७० टक्के रुग्ण ५०पेक्षा कमी वयोगटातील आहेत. म्हणजेच हायपर अ‍ॅसिडिटी व संबंधित परिस्थितीमागे जीवनशैलीतील कारणे अधिक प्रमाणात असल्याने हा आजार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो.

या वाढत्या समस्येवर डायजिन हा एक परिणामकारक उपाय आहे. भारतात सुमारे ९० वर्षांपासून उपलब्ध हे औषध डॉक्टरांकडून सुचवले जाणारे पहिल्या क्रमांकाचे औषध आहे. इतकेच नाही, या औषधाच्या परिणामकारकतेचे मूळ विज्ञानात आहे. ‘डायजिन’मध्ये हाय अ‍ॅसिड न्युट्रलायझिंग कपॅसिटी (एएनसी) आहे. म्हणजेच, रुग्णाच्या पोटातील अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करून रुग्णाला आराम देण्यात हे औषध फारच परिणामकारक आहे.

या विषयी बोलताना ‘एबॉट’च्या मेडिकल अफेअर्स विभागाच्या संचालिका डॉ. श्रीरूपा दास म्हणाल्या, ‘डायजिन’मधील परिणामकारक घटकांमुळे लक्षणांवर आराम मिळतो आणि पोटाच्या आतील स्तराचे संरक्षण होते. या औषधामुळे विज्ञानावर आधारित पद्धतीने वेगाने व परिणामकारक आराम पडतो. यामुळे अधिक चांगला परिणाम होतो. त्यामुळे, रुग्णांना पुन्हा सामान्य रितीने दैनंदिन जीवन जगता येते. लिक्विड, पावडर आणि गोळ्या अशा तीन स्वरूपांमध्ये उपलब्ध असलेले डायजिन हे भारतातील एकमेव अँटासिड आहे. ही औषधे घरी असताना किंवा बाहेर असतानाही सहज घेता येतात.’

‘महत्त्वाच्या गरजा आणि व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डायजिनने जीवनशैलीतून उद्भवणार्‍या हायपरअ‍ॅसिडिटीवर वैज्ञानिक उपचार देण्याच्या वैशिष्ट्यावर भर देत नवी मोहीम सुरू केली आहे. बहुआयामी अभिनेत्री तापसी पन्नू यात जीवनशैलीतून उद्भवणार्‍या हायपरअ‍ॅसिडिटीच्या मुद्दयावर भर देणार आहे. आधुनिक काळातील ग्राहकाला भेडसावणार्‍या समस्या आणि त्रास ती मांडणार आहे,’ अशी माहिती डॉ. दास यांनी दिली.

तरुणांसाठीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल एबॉट इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अंबाती वेणू म्हणाले, ‘दगदगीची आणि बेशिस्तीची जीवनशैली हे हायपर अ‍ॅसिडिटीचे प्रमुख कारण असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे आणि आजघडीच्या शहरी लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसते. भारतातील बहुंताश डॉक्टरांनी भरवसा ठेवलेले ‘डायजिन’ हे एक परिणामकारक औषध आहे. विशेष म्हणजे, यातील उच्च अ‍ॅसिड न्युट्रलायझिंग कपॅसिटीला वैज्ञानिक आधार आहे. देशातील लोकांसाठीची उत्पादन यादी वाढवत असताना लोकांना बरे होण्यासाठी आणि आरोग्यदायी राहण्यासाठी वैज्ञानिक उपाय उपलब्ध करून देण्यास ‘एबॉट’ कटिबद्ध आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search