Next
‘गोरगरिबांची सेवा, मदत करणे हाच आमचा धर्म’
‘टायगर ग्रुप महाराष्ट्र’चे जालिंदर जाधव यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, July 02, 2019 | 06:05 PM
15 0 0
Share this article:

मुंबई/करमाळा : ‘गोरगरिबांची सेवा, मदत करणे हाच आमचा धर्म असून, युवा वर्गाला घडवणे हा आमचा उद्देश असल्याचे टायगर ग्रुप महाराष्ट्रचे संस्थापक जालिंदर जाधव आणि अध्यक्ष तानाजी जाधव यांनी सांगितले.

या विषयी अधिक माहिती देताना जालिंदर जाधव म्हणाले, ‘आम्हीही गरिबी बघितली आणि अनुभवली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांच्या परिस्थितीचा विचार करून आम्ही ही संघटना चालवत आहोत. कोणालाच अडीअडचणी येऊ नये, गोर-गरिबांच्या अडीअडचणीमध्ये आपला हातभार लागला पाहिजे, रुग्णालयात आलेल्या गरिब, गरजू  रुग्णांना मदत करून त्यांच्या उपचारासाठी मदत व्हावी अशा हेतूने आम्ही टायगर ग्रुप तयार केला आहे.’

‘आमच्या या संघटनेत सामील होण्यासाठी सोशल मीडिया मिडियाद्वारे गेल्या १० ते१२ दिवसांत ४५ हजार युवक-युवतींनी ऑनलाइन सदस्य नोंदणी केली असून आमचे ध्येय १० लाखांपर्यंत पोहचणे हा आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की, आपला मुलगा निर्व्यसनी असावा हा हेतू आम्ही अंगी गाठला आहे. आम्ही आमच्या सदस्यांना कोणतेही व्यसन करू देत नाही. महाराष्ट्रातील गावागावांतपर्यंत संघटनेचे जाळे पसरत असून, आमचे ४० हजार व्हाट्सअॅप ग्रुप आहेत. संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा आमचा उद्देश आहे. संघटनेद्वारे कपडे वाटप, जेवण वाटप, खाऊ वाटप असे उपक्रम रोजच सुरू असतात,’ अशी माहिती जालिंदर जाधव यांनी दिली. 

सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तरुण-तरुणींनी या संघटनेत सामील व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले आहे. 

वेबसाइट : http://tigergroupindia.org
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search