Next
श्रीगजाननविजय कथामृत
BOI
Tuesday, February 19, 2019 | 10:04 AM
15 0 0
Share this story

श्रीदासगणू महाराज यांनी श्री गजानन महाराज यांच्यावर आधारित ‘श्रीगजाननविजय’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे रसग्रहण ‘श्रीगजाननविजय कथामृत’ यात करताना ओव्यांचे गद्य रूपांतर केले आहे. त्यातील कठीण शब्दांचे अर्थ, संकल्पनांचे स्पष्टीकरण, आवश्यक त्या ठिकाणी माहितीपूर्ण तळटीपा दिल्या आहेत.

‘श्रीगजाननविजय’ या ग्रंथातील घटना, व्यक्ती व प्रसंगांना स्थलकालनिर्देशांची जोडही दिली असून, काही ठिकाणी छायाचित्रेही आहेत. एकूण २१ अध्यायांमधून श्रीगजानन महाराज यांची महती गद्यरूपात असल्याने समजण्यास सोपे आहे. परिशिष्ट एकमध्ये ‘श्रीगजाननविजय’ ग्रंथाची पारायणपद्धतीम कामनिक पारायण व संकल्पविधान, गजानन महाराजांची षोडशोपचार पूजा याची माहिती दिली आहे.  

पुस्तक : श्रीगजाननविजय कथामृत
लेखक : श्रीदासगणू महाराज
प्रकाशक : वेदवाणी प्रकाशन
पाने : ३८४
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link