Next
‘वीरगती’ वेब फिल्म प्रजासत्ताकदिनी प्रेक्षकांच्या भेटीला
‘लागिरं झालं जी’फेम विक्या प्रमुख भूमिकेत
BOI
Thursday, January 24, 2019 | 12:49 PM
15 0 0
Share this article:

निखिल चव्हाणमुंबई : ‘लागिरं झालं जी’ मालिकेत वीरमरण पत्करणारा ‘अज्या’चा जिगरी मित्र ‘विक्या’ म्हणजेच निखिल चव्हाण याच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले. निखिल आता ‘वीरगती’ नावाच्या वेब फिल्ममध्ये दिसणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित असलेली ही वेब फिल्म २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेब फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

‘स्त्रीलिंगी-पुल्लिंगी’ या निखिलच्या वेब सीरिजची सध्या चर्चा सुरू असतानाच तो पुन्हा एकदा नव्या वेब फिल्ममध्ये दिसणार आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेनंतर आता ‘वीरगती’मध्येही तो जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये तो ‘सलीम शेख’ नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ‘झी ५ ओरिजनल’ची प्रस्तुती असलेली ही वेब फिल्म विशाल देसाई आणि राजू देसाई यांनी दिग्दर्शित केली आहे. नुकताच या वेब फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यू-ट्यूबवर या ट्रेलरने सहाच दिवसांत १८ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज असा निखिलचा प्रवास रोमांचकारी आहे. प्रत्येक भूमिका तो त्या भूमिकेशी एकरूप होऊन करतो. यामुळेच खूप कमी वेळात त्याला खूप चांगल्या भूमिका मिळाल्या. याचीच परिणती म्हणून आता या वेब फिल्ममध्ये तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘विक्या’प्रमाणेच या वेब फिल्ममधील ‘सलीम शेख’लाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.   

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search